शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नईकरांच्या जिभेवर ‘ट्रम्प दोसा’ची चव

By admin | Updated: November 18, 2016 01:13 IST

डोनाल्ड ट्रम्प यांचे चाहते काही फक्त अमेरिकेतच नाहीत, तर भारतातही ट्रम्प समर्थक दिसून येत आहेत.

चेन्नई : अमेरिकेतील निवडणुकीत रिपब्लिकनचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आणि राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. अर्थात, डोनाल्ड ट्रम्प यांचे चाहते काही फक्त अमेरिकेतच नाहीत, तर भारतातही ट्रम्प समर्थक दिसून येत आहेत. आता हेच पाहा ना, तामिळनाडूतील रामापूरमच्या एका रेस्टॉरंट मालकाने ट्रम्प यांच्या विजयामुळे उत्साहित होऊन चक्क ‘ट्रम्प दोसा’च सुरू केला आहे. सध्या हा चर्चेचा विषय आहे. रामपूरमजवळच्या वल्लुवर सलाई येथील रेस्टॉरंटचे मालक सी.पी. मुकुंद दास हे ट्रम्प यांचे चाहते आहेत. ट्रम्प विजयी झाल्यामुळे त्यांनी आता ट्रम्प यांच्या सन्मानार्थ ‘व्हाईट दोसा’ हा नवा मेन्यू सादर केला आहे. केळीच्या पानावर गरम गरम दोसा, सोबत सांबर, चटणी, लोणी आणि चवीला आणखीही बरंच काही. कुणाच्या तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल. या दोशाची किंमत आहे ५० रुपये. रेस्टॉरंटचे मालक सी.पी. मुकुंद दास म्हणतात की, मी ट्रम्प यांचा चाहता आहे. ट्रम्प जिंकावे असे मला नेहमीच वाटायचे. मी तर असे ठरविलेही होते की, ट्रम्प जिंकले तर त्यांच्या नावाने एखादा उपक्रम सुरू करीन. दास यांनी रेस्टॉरंटच्या समोरील भागातच ‘ट्रम्प स्पेशल’ असा फलकही लावला आहे. या उत्सुकतेतून अनेक जण रेस्टॉरंटला भेट देत आहेत. येथील मार्केटिंग मॅनेजर विपिन पुरुषोत्तम यांनी सांगितले की, दिवसभरात १३० दोशांची येथे मागणी आहे. शहरातील हे जुने हॉटेल असून,त्याच्या सहा शाखा आहेत. काही हितचिंतकांनी ‘ट्रम्प दोसा’ या नावावर आक्षेप घेत हा मुद्दा वादग्रस्त होऊ शकतो, असे सांगितले; पण दास हे आपल्या निर्णयावर ठाम होते. (वृत्तसंस्था)