शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

ट्रकची राजधानी एक्स्प्रेसला धडक; दोन डबे रुळावरुन घसरले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 10:29 AM

अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसली, तरी मोटरमनला गंभीर इजा झाली आहे. 

भोपाळ: राजधानी एक्स्प्रेसला थांडला येथे एका ट्रकनं धडक दिली. ट्रक फाटक ओलांडत असताना हा अपघात झाला. यामध्ये एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरुन घसरले. गोध्रा आणि रतलाम यांच्या दरम्यान असलेल्या क्रॉसिंगवर हा अपघात झाला. यामध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नसली, तरी मोटरमनला गंभीर इजा झाली आहे. गोध्रा आणि रतलाम यांच्या दरम्यान असलेलं फाटक वाहतुकीसाठी बंद होतं. राजधानी एक्स्प्रेस जात असल्यानं हे फाटक बंद ठेवण्यात आलं होतं. त्याचवेळी एक ट्रक थेट रुळांवर आला आणि एक्स्प्रेसला धडक दिली. या अपघातात ट्रकच्या चालकाचा मृत्यू झाला. सकाळी पावणे सातच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रकच्या धडकेमुळे एक्स्प्रेसचे दोन डबे रुळांवरुन घसरले. सुदैवानं यात कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. या अपघातानंतर घसरलेल्या डब्यांमधील प्रवाशांना दुसऱ्या डब्यांमध्ये हलवण्यात आलं आणि एक्स्प्रेस दिल्लीच्या दिशेनं रवाना झाली.  

टॅग्स :Rajdhani Expressराजधानी एक्स्प्रेसAccidentअपघात