शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

त्रिपुरा : भाजपासोबत एकवटले डाव्यांविरुद्धचे स्थानिक पक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 04:52 IST

ईशान्येकडील सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात राज्यांमध्ये ठसा उमटविण्याचे भाजपाने नेडा (नॉर्थईस्ट डेमॉक्रेटिक अलायन्स) मार्फत प्रयत्न चालविले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपुरातही भाजपाने २५ वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले.

- ललित झांबरेईशान्येकडील सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सात राज्यांमध्ये ठसा उमटविण्याचे भाजपाने नेडा (नॉर्थईस्ट डेमॉक्रेटिक अलायन्स) मार्फत प्रयत्न चालविले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपुरातही भाजपाने २५ वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले. गेल्या वर्षी राज्यात झालेल्या विधानसभा, पंचायत पोटनिवडणुका, आगरतळा महापालिका तसेच अन्य नगरपालिका निवडणुकांत भाजपानेच घवघवीत यश मिळवले. त्यामुळे त्रिपुरात सध्यातरी भाजपा यशाच्या लाटेवर आरूढ असल्याचे चित्र आहे.माणिक सरकार यांच्या जागी मुख्यमंत्रीपदी आलेले भाजपाचे तरुण नेते विप्लबकुमार देव विराजमान झाले आहेत. ते सतत वादग्रस्त विधाने करीत असतात. पण त्यांनी पीपल्स फ्रंट आॅफ त्रिपुराला (आयपीएफटी) सोबत घेतल्याने भाजपाची स्थिती मजबूत झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत माकपसाठी दोन्ही जागा कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे.विधानसभेत २०१३ साली भाजपाला एकही जागा मिळाली नव्हती. मात्र २०१८ मध्ये ३५ जण निवडून आले. ८ जागा सहयोगी आयपीएफटीनेही जिंकल्या. याप्रकारे ^६० पैकी ४४ जागा जिंकून राज्यात बिगरकम्युनिस्ट सरकार सत्तेवर आले. माकपची ४९ जागांवरून १६ जागांवर घसरण झाली. ही जादू स्वतंत्र त्रिप्रालँड राज्याची मागणी करणाºया आयपीएफटीशी भाजपाने केलेल्या युतीमुळे शक्य झाली. कम्युनिस्टांची दडपशाही व कारवाईमुळे आयपीएफटी नाराज होती. त्यातून त्यांनी आदिवासी पट्ट्यातील ९ पैकी ८ जागा जिंकून ताकद दाखवून दिली. आदिवासी भाग जिल्हा स्वायत्त परिषदेला (टीटीएडीसी) अधिक निधी व योजनांद्वारे बळकट करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ते एकत्र आले आणि आदिवासी भागांतही भाजपाला ताकद मिळाली.मार्क्सवादी कम्युनिस्टांनी निवडणुका जिंकण्यासाठी हवा तसा जोरच लावला नाही असा तृणमूल काँग़्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा आरोप आहे. आहे. काँग्रेसने तृणमूल काँग़्रेसशी युती केल्यास चित्र वेगळे राहील, असे त्यांना वाटते. त्यामुळे आता भाजपाविरोधी सर्व पक्ष एकत्र होण्यावरच लढती किती चुरशीच्या होतात, हे ठरेल. पण ते सर्व एकत्र येतील का, हा प्रश्न आहे.भाजपाविरोधी पक्षांच्या एकत्र येण्यास सीताराम येचुरी अनुकूल होते, तर प्रकाश करात यांचे मात्र इतरांपासून माकपने वेगळेच राहावे असे धोरण होते. आताही ते तसेच आिहे. मात्र भाजपाने डाव्याविरोधातील घटकांंना एकत्र आणण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांही भाजपा पूर्ण ताकदीनिशी लढण्याच्या तयारीत आहे.सहा वेळा माकप, आता काय होणार?त्रिपुरामध्ये साधारण २६ लाखांच्या वर मतदार असून दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी त्रिपुरा(पश्चिम) हा खुला तर त्रिपुरा (पूर्व) हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या दोन्ही मतदारसंघांमध्ये १९८९ व १९९१ मध्ये काँग़्रेसने विजय मिळविला. त्यानंतर १९९६, १९९८, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा सलग सहा लोकसभा निवडणुकांमध्ये माकपने यश मिळवले. या लोकसभा निवडणुकांत मार्क्सवादी उमेदवाराचा विजय आणि काँग्रेस दुसºया स्थानी असेच चित्र असायचे. या मतदारसंघातून अनुक्रमे शंकर प्रसाद दत्ता व जितेंद्र चौधरी हे दोघे खासदार आहेत. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण