शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत तिसऱ्यांदा मंजूर; काँग्रेसचा सभात्याग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 6:53 PM

तिहेरी तलाक विधेयकाच्या बाजूनं ३०३ मतं

नवी दिल्ली: लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाच्या बाजूनं ३०३ खासदारांनी मतदान केलं. तर ८२ खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान केलं. यावेळी काँग्रेस, तृणमूल आणि जदयूचे खासदार सभागृहातून बाहेर पडले. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत दोनवेळा मंजूर झालं होतं. मात्र राज्यसभेत सरकारकडे बहुमत नसल्यानं हे विधेयक संमत होऊ शकलं नाही. आज तिहेरी तलाक विधेयकावर लोकसभेत जोरदार चर्चा झाली. सरकारच्या वतीनं कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी विधेयकावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी मोहम्मद पैगंबरांचा संदर्भ दिला. 'तिहेरी तलाक अयोग्य असल्याचं पैगंबरांचं मत होतं. मग असदुद्दीन ओवेसींनी तिहेरी तलाकमुळे त्रासलेल्या महिलांच्या बाजूनं उभं राहायला हवं,' असं आवाहन प्रसाद यांनी केलं. पैगंबरांच्या एका अनुयायानं पत्नीला तिहेरी तलाक दिला होता. त्यावेळी ते खूप नाराज झाले होते, असं प्रसाद यांनी म्हटलं.  तिहेरी तलाक विधेयकावरुन एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसींनी सरकारला लक्ष्य केलं. या विधेयकात तलाक देणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षांची शिक्षा आणि दंडांची तरतूद आहे. शिक्षा झाल्यानंतर तुरुंगात असलेला पती आपल्या पत्नीला पैसे कसे काय देणार? असा प्रश्न औवेसी यांनी विचारला आहे. सरकारकडून लग्न प्रथाच नष्ट करण्यात येत आहे. महिलेला रस्त्यावर आणि तिच्या पतीला तुरुंगात टाकत आहे. मुस्लीमांच्या त्यांच्या सभ्यता आणि शिष्टाचारापासून दूर करण्याचा हा डाव आहे, अशा शब्दांत ओवेसींनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी आणि खासदार शशी थरुर यांनीदेखील तिहेरी तलाक विधेयकाला विरोध दर्शवला. 'सर्वोच्च न्यायालयानं तीन तलाकचं गुन्हेगारीकरण करण्यास सांगितलेलं नाही. आमचा याच गोष्टीला विरोध आहे,' असं चौधरी म्हणाले. तर केवळ एका समुदायाच्या महिलांसाठीच कायदा का आणला जात आहे, इतर समुदायांसाठी असा कायदा का नाही, असे प्रश्न थरुर यांनी उपस्थित केले.  

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसMuslimमुस्लीमBJPभाजपाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन