शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

VIDEO: ओवेसींना पूनम महाजनांची टक्कर, महिला सन्मानावर बोलल्या 'कट्टर'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 8:43 PM

पूनम महाजनांचं ओवेसींना जोरदार प्रत्युत्तर

नवी दिल्ली: तिहेरी तलाक विधेयकावरील चर्चेदरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनीभाजपावर आणि मोदी सरकारवर टीका केली. ओवेसींच्या टीकेला भाजपाकडून खासदार पूनम महाजन यांनी उत्तर दिलं. तुमच्या कुटुंबातील एखाद्या महिलेला तिच्या पतीनं फोनवरुन तलाक दिला, तर त्याचं अभिनंदन कराल का, असा सवाल महाजन यांनी विचारला.तिहेरी तलाक विधेयक व्हॉट्स अ‍ॅप, फोन कॉलवरुन तलाक देणाऱ्यांविरोधात आहे. कारण जेवणात मीठ कमी पडलं म्हणूनही तलाक देणाऱ्या महिलांच्या व्यथा आम्ही जाणून आहोत, असं महाजन म्हणाल्या. इंग्रजीत पुरुषाला he आणि महिलेला she म्हणतात. त्या she चा अर्थ सुपीरियर टू ही (Superior to he) असा होता. तिहेरी तलाकविरोधातील याचिकेवर १० लाख महिलांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यांना आपण वाऱ्यावर सोडू शकत नाही. हा आमचा न्यायासाठीचा लढा असून आम्ही कोणावरही अन्याय होऊ देणार नाही', अशा शब्दांत महाजन यांनी ओवेसींनी प्रत्युत्तर दिलं.  महाजन यांच्याआधी असदुद्दीन ओवेसींनी तिहेरी तलाक विधेयकावरुन सरकारला लक्ष्य केलं. या विधेयकात तलाक देणाऱ्या व्यक्तीस 3 वर्षांची शिक्षा आणि दंडांची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षा झाल्यानंतर तुरुंगात असलेला पती आपल्या पत्नीला पैसे कसे काय देणार? असा प्रश्न औवेसी यांनी विचारला. सरकारकडून लग्न प्रथाच नष्ट करण्यात येत आहे. सरकार महिलेला रस्त्यावर आणि तिच्या पतीला तुरुंगात टाकत आहे. मुस्लीमांना त्यांच्या सभ्यता आणि शिष्टाचारापासून दूर करण्याचा हा डाव आहे. इस्लाम धर्मात लग्न हे जन्मोजन्मीचं नातं नसून केवळ एक कॉन्ट्रॅक्ट आहे, असं औवेसी यांनी म्हटलं. हे विधेयक संविधानविरोधी असून यामध्ये तिहेरी तलाक हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. न्यायालयाने समलैंगिकता गुन्हा नसल्याचं म्हटलंय, मग ट्रिपल तलाक गुन्हा कसा? असा प्रश्नही ओवेसींनी उपस्थित केला.  

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकPoonam Mahajanपूनम महाजनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपा