शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

विमानाने प्रवास करताय? सावधान! ५० टक्के विमानांमध्ये तांत्रिक बिघाड; संसदीय समितीचा धक्कादायक अन् भयभीत करणारा अहवाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:14 IST

या अहवालानुसार, तांत्रिक बिघाड असलेल्या विमानांच्या यादीत इंडिगो एअरलाईन्स आघाडीवर आहे...

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. संसदीय समितीने सादर केलेल्या एक ताज्या अहवालानुसार, तब्बल ५० टक्के व्यावसायिक विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे उघड झाले आहे. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये ७५४ विमानांपैकी तब्बल ३७७ विमानांमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड आढळल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांत सर्वाधिक बिघाड -या अहवालानुसार, तांत्रिक बिघाड असलेल्या विमानांच्या यादीत इंडिगो एअरलाईन्स आघाडीवर आहे. इंडिगोच्या ४०५ विमानांच्या ऑडिटमध्ये १४८ विमानांत तांत्रिक बिघाड आढळून आला आहे. याशिवाय, एअर इंडियाची स्थितीही अत्यंत गंभीर आहे, त्यांच्या १६६ पैकी १३७ विमानांमध्ये वारंवार तांत्रिक समस्या आढळून आली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या १०१ पैकी ५४ विमानांमध्येही दोष आढळले आहेत.

अहवालात बोईंग ७८७ आणि ७७७ विमानांच्या वैमानिकांच्या प्रशिक्षणातील उणिवांवरही बोट ठेवण्यात आले आहे. तसेच, अनेक आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये अपुरे केबिन क्रू आणि 'फ्लाइट ड्युटी टाईम'च्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. एअर इंडियाला सुरक्षा नियमांच्या उल्लंघनासाठी डीजीसीएने ९ कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. २०२५ च्या अखेरपर्यंत विविध एअरलाईन्सना एकूण १९ नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. यामध्ये कॉकपिटमध्ये अनधिकृत प्रवेश आणि कालबाह्य आपत्कालीन उपकरणांचा वापर यांसारख्या गंभीर बाबींचा समावेश आहे.

डीजीसीएची यंत्रणाही खिळखिळीविमान वाहतूक क्षेत्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या डीजीसीए (DGCA) मध्ये ४८.३ टक्के पदे रिक्त असल्याचे अहवालात म्हटले आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे वाढत्या विमान वाहतुकीवर देखरेख ठेवणे कठीण होत असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने सुधारणा करण्याची आणि देखरेख यंत्रणा अधिक कडक करण्याची शिफारस समितीने केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Alarming report: Technical faults plague 50% of planes, posing safety risks.

Web Summary : A parliamentary report reveals 50% of commercial planes have technical issues. Indigo and Air India have the most faults. DGCA faces staff shortages, hindering oversight and raising safety concerns. Urgent improvements are needed.
टॅग्स :airplaneविमानIndigoइंडिगोAir Indiaएअर इंडियाpassengerप्रवासी