चीन देतंय पाकिस्तानी सैन्याला प्रशिक्षण

By Admin | Updated: November 15, 2014 11:35 IST2014-11-15T10:13:08+5:302014-11-15T11:35:27+5:30

पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनी सैन्य पाकिस्तानी सैन्याला प्रशिक्षण देत असल्याचे गोपनीय माहिती भारताच्या सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे.

Training to the Pakistani army by giving China training | चीन देतंय पाकिस्तानी सैन्याला प्रशिक्षण

चीन देतंय पाकिस्तानी सैन्याला प्रशिक्षण

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी सैन्य पाकिस्तानी सैन्याला प्रशिक्षण देत असल्याचे गोपनीय माहिती भारताच्या सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. याशिवाय सीमा रेषेलगत पाकिस्तानी रेंजर्सऐवजी पाक सैन्याचे विशेष पथक नेमण्याची तयारीही पाकने सुरु केल्याचे सूत्रांनी सांगितले. 
भारत - पाक सीमारेषेवर तणावपूर्ण वातावरण असतानाच भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) गोपनीय विभागाला पाक व्याप्त काश्मीरमध्ये हालचालींची माहिती मिळाली आहे. यामध्ये  चिनी सैन्यातील तज्ज्ञ पाक सैन्याला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देत असल्याचे बीएसएफच्या निदर्शनास आले आहे. पाक सैन्याला नेमक्या कोणत्या शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जात आहे याविषयी बीएसएफने खुलासा केलेला नाही.
पाक सैन्यातील संभाषणावरुन पाक सैन्य व पाकिस्तानी रेंजर्स भारतीय जवान आणि मालमत्तेला लक्ष्य साधण्यासाठी महत्त्वाच्या चौक्यांवर अचूक नेम असलेल्या जवानांची नियुक्ती करत असल्याचे समोर आले आहे. पाक सैन्याच्या विशेष प्रशिक्षित पथकाने  पाकमधील महत्त्वपूर्ण चौक्यांचा ताबाही घेतला असल्याचे बीएसएफच्या पथकाने म्हटले आहे. 

Web Title: Training to the Pakistani army by giving China training