शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच देणार अन्य पर्याय

By admin | Updated: September 26, 2015 03:00 IST

आपले प्रवासी, ग्राहक अन्य पर्यायांकडे जाण्यापासून रोखण्याचा भाग म्हणून ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीम’ (क्रिस) चा रेल्वे बुकिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचा प्रयोग सध्या चालू आहे.

नवी दिल्ली : आपले प्रवासी, ग्राहक अन्य पर्यायांकडे जाण्यापासून रोखण्याचा भाग म्हणून ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टीम’ (क्रिस) चा रेल्वे बुकिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचा प्रयोग सध्या चालू आहे. हव्या त्या गाडीचे आणि वर्गाचे आरक्षण उपलब्ध नसल्यास अन्य गाड्यांचे पर्याय सुचविणारी ही प्रणाली महिनाभरात कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत. शिवाय रेल्वेच्या प्रवासी भाड्याच्या उत्पन्नातही किमान १५ ते २0 टक्क्यांची वाढ नव्या सॉफ्टवेअरमुळे होण्याची अपेक्षा आहे.इंटरनेटवर रेल्वे प्रवासाचे आरक्षण करताना हवे ते तिकीट मिळाले नाही, तर ही वेबसाइट यापुढे तुम्हाला विविध पर्याय सुचवणार आहे.त्याच ट्रेनच्या इतर वर्गात जागा उपलब्ध असेल तर तो पहिला पर्याय अन्यथा दुसरी ट्रेन अथवा जवळपासच्या रेल्वे स्थानकांचे पर्याय सुचवणारी खिडकीही त्याच साइटवर उघडेल. रेल्वेचे बहुसंख्य प्रवासी वेटिंग लिस्टचा धोका पत्करू इच्छित नाहीत. कन्फर्म तिकीट मिळाले नाही तर त्याच प्रवासासाठी ते दुसरी साधने शोधतात. अनेक प्रवाशांना फक्त लोकप्रिय ट्रेन्सच माहीत असतात. त्याच रूटवर अन्य ट्रेन्समध्ये जागा उपलब्ध असल्या तरी त्याची त्यांना कल्पना नसते. सध्या रेल्वे प्रवासाचे आरक्षण करण्यासाठी प्रत्येक ट्रेनची आरक्षण स्थिती स्वतंत्रपणे शोधावी लागते. नव्या व्यवस्थेत प्रवाशांचाहा त्रास वाचणार आहे.रेल्वे बोर्डाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नवी व्यवस्था लागू करण्यासाठी रेल्वेच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचा ९0 टक्के भाग क्रिसने पूर्ण केला असून, किरकोळ स्वरूपाचे काम बाकी आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)