सण साजरा करण्यासाठी सुट्टीवर घरी आलेल्या दोन तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणांचा अतिमद्यप्राशनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात संक्रांतीच्या उत्सवात बिअर पिण्याची स्पर्धा लावणे या तरुणांच्या जीवावर बेतले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मणिकुमार (वय, ३५) आणि पुष्पराज (वय, २२) अशी मृतांची नावे आहेत. मणिकुमार चेन्नईत, तर पुष्पराज बेंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी ते आपल्या बंदावद्दीपल्ले या गावी आले. उत्सवाच्या दरम्यान मित्रांसोबत मद्यप्राशन करताना त्यांनी बिअर पिण्याची स्पर्धा लावली. ही स्पर्धा जिंकण्याच्या नादात त्यांनी मर्यादेपेक्षा जास्त मद्यप्राशन केले आणि ते जागीच बेशुद्ध पडले.
दोघेही शुद्धीवर येत नसल्याचे पाहून कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जास्त प्रमाणात अल्कोहोल शरीरात गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मणिकुमार यांच्या पश्चात पत्नी आणि दोन वर्षांचा लहान मुलगा आहे. कुटुंबाचा आधार गेल्याने पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर, पुष्पराज हा तरुण अविवाहित होता आणि नुकताच करिअरमध्ये स्थिरावत होता.
पोलीस तपास सुरू
मणिकुमारच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सीआरपीसी कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सणासुदीच्या काळात अशा प्रकारे स्पर्धा लावून मद्यप्राशन करणे किती घातक ठरू शकते, याचे हे अत्यंत विदारक उदाहरण आहे. मद्याचा अतिवापर की मद्यामध्ये काही विषबाधा होती, याचाही तपास पोलिस करत आहेत.
Web Summary : Two software engineers died in Andhra Pradesh after a beer-drinking contest during Sankranti. Manikumar, 35, and Pushpraj, 22, consumed excessive alcohol, leading to their deaths. Police are investigating, and a case has been registered. The incident has cast a pall of gloom over the village.
Web Summary : आंध्र प्रदेश में संक्रांति के दौरान बीयर पीने की प्रतियोगिता में दो सॉफ्टवेयर इंजीनियरों की मौत हो गई. मणिकुमार, 35, और पुष्पराज, 22, ने अत्यधिक शराब का सेवन किया, जिससे उनकी जान चली गई. पुलिस जांच कर रही है और मामला दर्ज कर लिया गया है. घटना से गांव में शोक की लहर है.