शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नवसाला पावणार्‍या र्शी दादाशेठची परंपरा कायम चंडक बगिचा : दहा दिवसांत आकर्षक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2015 00:53 IST

संताजी शिंदे/सोलापूर :

संताजी शिंदे/सोलापूर :
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।।1।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
अशी आरती करीत बाळीवेस येथील कस्तुरबा मंडईसमोरील चंडक बगिचा येथे नवसाला पावणार्‍या र्शी दादाशेठ गणपतीच्या उत्सवाची परंपरा गेल्या 35 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. सोसायटीतील सर्व मंडळी एकत्र येऊन हा उत्सव मोठय़ा आनंदात साजरा करतात. दहा दिवसांत विविध उपक्रम राबवून मंगलमय वातावरणाची निर्मिती केली जाते.
बाळू दरक यांच्या अध्यक्षतेखाली यंदाच्या वर्षी नवसाला पावणारा र्शी दादाशेठ गणपतीचा उत्सव साजरा होत आहे. पहिल्या दिवशी मोठय़ा उत्साहात बाप्पाचे स्वागत करण्यात आले. दहा दिवसांच्या कालावधीत मटकी गेम, फनी गेम्स, गायन स्पर्धा, विविध प्रकारच्या मेमोरी गेम्स, संगीत खुर्ची, भव्य दांडीया रास स्पर्धा, कराओके व क्रिकेट, र्शींसाठी 56 भोगाचा उपक्रम, र्शी सत्यनारायण भगवानची महापूजा आदी उपक्रम राबविले जातात.
र्शींकरिता 56 भोग हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये सोसायटीतील प्रत्येक घरातून आवडीचा एक पदार्थ करण्यास सांगितले जाते. हा आवडीचा पदार्थ सर्वजण गणपती मंदिरात घेऊन येतात. तेथे आरती पूजा करून प्रत्येकाच्या घरातून येणार्‍या पदार्थाचे प्रसाद म्हणून वाटप केले जाते. यामुळे सर्व कुटुंबीय एकत्र येऊन महाप्रसादाबरोबर आनंद साजरा करतात. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व मंडळी यामध्ये सहभागी होतात. तरूण-तरूणी दांडीया रास खेळून गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करतात. दररोज संध्याकाळी चालणार्‍या या उत्सवात सर्व सोसायटी एकत्र येऊन मनाला आनंद देणारा क्षण अनुभवतात आणि शेवटच्या दिवशी मोठय़ा र्शद्धेने बाप्पाला निरोप देतात.

चौकट..
सुवर्ण गणपती..
याच ठिकाणी किशोर चंडक यांच्या सहकार्याने सुवर्ण गणपती मंदिराची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. याही ठिकाणी सोसायटीतील लोक मोठय़ा उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. र्शी दादाशेठ गणपतीचा जी मंडळी उत्सव साजरा करतात तीच मंडळी सुवर्ण गणपतीलाही असतात. एकाच सोसायटीतील दोन गणपती उत्सव हा दहा दिवसांतील अविस्मरणीय सोहळा असतो. तो पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील लोकही येत असतात.

(.............दि.21 सप्टेंबर साठीचा कॉलनीतील गणपती...........फोटो यशवंत सादूल यांनी काढला आहे.......)