"आज आम्ही भोगतोय, वेळ बदलेल तेव्हा…’’ EDच्या चौकशीला हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:16 IST2025-04-16T13:15:49+5:302025-04-16T13:16:32+5:30
Robert Vadra News: ईडीकडून होणाऱ्या चौकशीसाठी पत्नी प्रियंका गांधी यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रा यांनी सूचक विधान केलं आहे. आज आम्ही भोगत आहोत. वेळ बदलेल आणि वेळ बदलेल तेव्हा कदाचित त्यांनाही भोगावं लागेल, असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं आहे.

"आज आम्ही भोगतोय, वेळ बदलेल तेव्हा…’’ EDच्या चौकशीला हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रांचं सूचक विधान
नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह संपूर्ण कुटुंब अडचणीत सापडलेलं असतानाच जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी सुरू आहे. हरयाणामधील शिकोपूर जमीन व्यवहार प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची सलग दुसऱ्या दिवशी ईडीकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीसाठी पत्नी प्रियंका गांधी यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयात हजर झालेल्या रॉबर्ट वाड्रा यांनी सूचक विधान केलं आहे. आज आम्ही भोगत आहोत. वेळ बदलेल आणि वेळ बदलेल तेव्हा कदाचित त्यांनाही भोगावं लागेल, असं रॉबर्ट वाड्रा यांनी म्हटलं आहे.
ईडीच्या चौकशीला उपस्थित राहण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, आम्ही कुणालाही घाबरत नाही. आम्ही प्रासंगित आहोत, त्यामुळे आम्हाला लक्ष्य केलं जात आहे. मग राहुल गांधी यांना संसदेत रोखलं जात आहे तर मला बाहेर रोखलं जातंय. निश्चितपणे आम्ही निशाण्यावर आहोत. मात्र आम्ही सोपं सॉफ्ट टार्गेट नाही तर हार्ड टार्गेट आहोत.
रॉबर्ट वाड्रा या चौकशीवरून सूचक इशारा देताना पुढे म्हणाले की, वेळ नेहमी बदलत राहते. आज आम्ही भोगत आहोत. वेळ बदलेल तेव्हा कदाचित त्यांनाही भोगावं लागेल. मला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही. कुठलीही बाब लपवून ठेवलेली नाही. या प्रकरणात हरयाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मला दोन वेळा क्लीन चिट दिलेली आहे. आता सात वर्षांनंतर मला त्याच प्रकरणाबाबत पुन्हा नव्याने का प्रश्न विचारले जात आहेत, हे मला समजत नाही आहे. मी कुठल्या ही प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार नाही. मी पूर्ण, शक्तिनिशी येथे आलो आहे. मी सर्व प्रश्नांची उत्तरं देईन, असेही रॉबर्ट वाड्रा यावेळी म्हणाले.