आजपासून संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी प्रायोगिक तत्त्वावर सुरू ्नरेनबो नावाने ब्रॅडींग : नागरिकांसाठी ८ दिवसात होणार खुली फोटो आहेत - दीपक लॉग इनला
By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:20+5:302015-07-31T22:25:20+5:30
पुणे : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीआरटीस शनिवार पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरूवात होत आहे. रेनबो या नावाने बीआरटी प्रकल्पाचे ब्रॅडींग करण्यात येणार असून अहमदाबाद बीआरटीच्या धर्तीवर पुणेकरांना ही सेवा पुरविली जाणार आहे. पीएमपीचे अधिकारी व कर्मचार्यांकडून शनिवारपासून याची चाचणी घेतली जाणार आहे, त्यामध्ये आलेल्या सर्व अडचणी दूर झाल्यानंतर ८ दिवसांमध्ये नागरिकांसाठी खुली केली जाईल.

आजपासून संगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी प्रायोगिक तत्त्वावर सुरू ्नरेनबो नावाने ब्रॅडींग : नागरिकांसाठी ८ दिवसात होणार खुली फोटो आहेत - दीपक लॉग इनला
प णे : अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या संगमवाडी ते विश्रांतवाडी या बीआरटीस शनिवार पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरूवात होत आहे. रेनबो या नावाने बीआरटी प्रकल्पाचे ब्रॅडींग करण्यात येणार असून अहमदाबाद बीआरटीच्या धर्तीवर पुणेकरांना ही सेवा पुरविली जाणार आहे. पीएमपीचे अधिकारी व कर्मचार्यांकडून शनिवारपासून याची चाचणी घेतली जाणार आहे, त्यामध्ये आलेल्या सर्व अडचणी दूर झाल्यानंतर ८ दिवसांमध्ये नागरिकांसाठी खुली केली जाईल.स्वारगेट ते कात्रज मार्गावरील बीआरटी फसल्यानंतर त्यामध्ये झालेल्या सर्व चुका दूर करून महापालिकेकडून संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गावरील बीआरटी सुरू केली जात आहे. अनेक चांगल्या सुविधा या बीआरटीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी त्याबाबत माहिती दिली. कुणाल कुमार म्हणाले, संगमवाडीच्या मार्गावरून केवळ बीआरटीच्या बस धावणार आहेत, त्यामधून एसटी महामंडळ तसेच कोणत्याही खाजगी वाहन नेता येणार नाही. या मार्गावरून दिवसभर ६० बस धावणार आहेत, बसस्टॉपवर बसच्या वेळांची सर्व माहिती प्रवाशांना मिळणार आहे. बसस्टॉपची दिवसातून ३ वेळा स्वच्छता केली जाईल, तसेच २४ तास त्याठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात असणार आहेत.' बसस्थानकावर सुध्दा कोणती बस कोठे आहे, किती वेळात बस येईल अशी माहिती प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. स्वारगेट येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे, या नियंत्रण कक्षातून बसचालकाशी संवाद साधता येणार आहे. बसचालकांनाही काही अडचण आल्यास नियंत्रण कक्षाला कळविता येणार आहे. एका जपानी कंपनीकडून नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी खासगी कंपनी नेमण्यात आली आहे.चौकटबीआरटी सेवा मिळणार अधिक वेगवानसंगमवाडी ते विश्रांतवाडी बीआरटी मार्गावर एसटी महामंडळाच्या बस तसेच इतर सर्व खाजगी वाहनांना मनाई करण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुक पोलिसांनी त्याबातचे आदेश काढले आहेत. रेनबो बीआरटीच्या ७० बसच फक्त या मार्गावरून धावू शकतील. यामुळे बीआरटी सेवा अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे. प्रवासाचा कालावधी निम्माने कमी होणार आहे.चौकटसुरूवातीचे काही दिवस मोफतबीआरटी सेवेला चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून सुरूवातीचे काही दिवस बीआरटी सेवा मोफत पुरविण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे असे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.