शहरं
Join us  
Trending Stories
1
टेरिफ डील होईना...! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; अमेरिकन दूताने दिले महत्त्वाचे संकेत
2
"माझा पराभव होणे आणि शिवसेनेचा पूर्णपणे पराभव होणे, यात मोठा फरक, ते 'वैफल्यग्रस्त'"; रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
3
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
4
मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; रिलायन्स इंडस्ट्रीज 'या' राज्यात करणार ₹7 लाख कोटींची गुंतवणूक
5
IND vs NZ ODI : वॉशिंग्टन सुंदर वनडे मालिकेतून OUT! ‘या’ युवा खेळाडूला टीम इंडियात पहिली संधी
6
Holiday Election: राज्यातील २९ शहरांमध्ये १५ जानेवारीला सुट्टी; कोणत्या शहरांचा समावेश, पहा संपूर्ण यादी
7
व्हेनेझुएलाचा 'गुप्त' खजिना! कच्चे तेल किंवा सोने नाही तर 'या' वस्तूवर अमेरिकेचा डोळा?
8
"रोज रशियाचे 1000 सैनिक मारले जात आहेत, हा निव्वळ 'वेडेपणा', अमेरिका..."; झेलेंस्की यांचा धक्कादायक दावा
9
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
10
केवळ 'बजेट' महत्त्वाचे नाही! 'अर्थविधेयक' ठरवते महागाई, टॅक्स अन् बरच काही; बारकावे समजून घ्या
11
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
12
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
13
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
14
Makar Sankrant 2026: संक्रांत साजरी करता, पण आदला आणि नंतरचा दिवस का महत्त्वाचा माहितीय?
15
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
16
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
17
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
18
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
19
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
Daily Top 2Weekly Top 5

आज दंगलीत माझ्या वडिलांनी जीव गमावलाय, उद्या कुणाचे वडील जातील? शहीद पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा संतप्त सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 10:27 IST

धार्मिक तणावामध्ये आज माझ्या वडिलांचा बळी गेलाय, आता उद्या कुणाचे वडील जीव गमावतील? असा संतप्त सवाल पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा मुलगा अभिषेक याने केला आहे. 

ठळक मुद्देकथित गोहत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे उसळलेल्या दंगलीत  सुबोध कुमार सिंह या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. हिंदू आणि मुस्लिम समाजात निर्माण झालेल्या तणावामध्ये आज माझ्या वडिलांचा बळी गेलाय, आता उद्या कुणाचे वडील जीव गमावतील? असा संतप्त सवाल पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा मुलगा अभिषेक याने केला आहे. बुलंदशहर जिल्ह्यातील स्यानामधील एका गावात शेतात गोवंशाचे अवशेष आढळले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोलीस आणि जमावामध्ये वादावादी झाली.

बुलंदशहर (उत्तर प्रदेश) -  कथित गोहत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे उसळलेल्या दंगलीत सुबोध कुमार सिंह या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हिंदू आणि मुस्लिम समाजात निर्माण झालेल्या तणावामध्ये आज माझ्या वडिलांचा बळी गेलाय, आता उद्या कुणाचे वडील जीव गमावतील? असा संतप्त सवाल पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा मुलगा अभिषेक याने केला आहे. बुलंदशहर जिल्ह्यातील स्यानामधील एका गावात शेतात गोवंशाचे अवशेष आढळले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोलीस आणि जमावामध्ये वादावादी झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्या जमावावर गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर मोडतोड आणि जाळपोळ केली. यात पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या दंगलीत आपल्या वडलांना गमावणारा अभिषेक म्हणाला की, ''माझे वडील मला धर्माच्या नावावरून समाजात हिंसाचार न माजवणारा चांगला नागरिक घडवू इच्छित होते. मात्र आज माझ्या वडलांनाच हिंदू-मुस्लिम दंगलीमध्ये आपले प्राण गमवावे लागले. आज दंगलीत माझ्या वडलांनी जीव गमावलाय, उद्या  कुणाचे वडील जातील?" दरम्यान, बुलंदशहर दंगली प्रकरणी पोलिसांनी संशयितांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 87 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आली असून, दोन जणांना अटक करण्यात आली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसIndiaभारतMuslimमुस्लीमHinduहिंदू