शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Mamata Banerjee : "बंगालला जाणीवपूर्वक बदनाम केलं जातंय..."; दिल्लीत पोहोचताच ममता बॅनर्जी कडाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:27 IST

TMC Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत पाऊल ठेवताच केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत पाऊल ठेवताच केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे. चाणक्यपुरी येथील 'बंग भवन' येथे जाऊन त्या बंगालमधून आलेल्या लोकांची भेट घेणार आहेत आणि दिल्ली पोलिसांकडून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती घेणार आहेत. "बंगालला जाणीवपूर्वक बदनाम केलं जात असून केंद्रीय यंत्रणा भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत" असा थेट आरोप ममतांनी केला.

"जेव्हा केंद्रीय गृहमंत्री पश्चिम बंगालमध्ये येतात, तेव्हा राज्य सरकार त्यांचं स्वागत 'रेड कार्पेट' टाकून करतं. मात्र जेव्हा बंगालचे लोक किंवा त्यांचे लोकप्रतिनिधी दिल्लीत येतात, तेव्हा त्यांना 'ब्लॅक कार्पेट'सारखी वागणूक दिली जाते" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच ममतांनी याला अपमानास्पद आणि पक्षपातीपणाचे लक्षण म्हटलं असून, हा मुद्दा केवळ सन्मानाचा नसून लोकशाही आणि समान वागणुकीचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

या अन्यायाविरुद्ध आणि छळाविरुद्ध आपण आवाज उठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि दिल्ली प्रशासनाने बंगालच्या लोकांशी निष्पक्ष आणि समान वागणूक द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बंगालमधून आलेल्या लोकांच्या हक्कांच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने ममतांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरूनही प्रश्न उपस्थित केले.

"जर दिल्लीत एखादा स्फोट झाला, तर दिल्ली पोलीस कुठे असतात? जेव्हा मी स्वतः येथे येते, तेव्हा दिल्ली प्रशासन घाबरतं. जर मला हवं असतं, तर मी लाखो लोकांना येथे आणू शकले असते, पण मी केवळ अशा ५० लोकांना सोबत आणलं आहे ज्यांना 'एसआयआर' (SIR) मध्ये मृत दाखवण्यात आलं होतं. दिल्लीत अजूनही सरंजामशाही पद्धत सुरू असून नागरिकांच्या सुरक्षेची खात्री दिली जात नाही" असं ममतांनी म्हटलं आहे. 

तृणमूल काँग्रेसने (TMC) आपल्या अधिकृत पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडणार आहे. वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष केले गेल्याने, आता निवडणूक आयोगाकडून तातडीने सुधारात्मक कारवाईची मागणी केली जाईल. पीडित कुटुंबांचे अधिकार आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ममता बॅनर्जींचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mamata Banerjee accuses deliberate defamation of Bengal upon Delhi arrival.

Web Summary : Mamata Banerjee criticizes the central government and Delhi police, alleging deliberate defamation of Bengal and biased treatment of its people visiting Delhi. She demands fair treatment and raises security concerns, emphasizing democracy and equal rights.
टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसPoliticsराजकारणdelhiदिल्लीBJPभाजपा