शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

'राजा-महाराजांचा जमाना गेला; ज्योतिरादित्य शिंदेंच्या जाण्याने फरक पडत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:32 AM

मध्य प्रदेशातील काँग्रेस आणि कमलनाथ यांचे सरकार कायम राहणार आहे. येत्या 16 मार्च रोजी तुम्हाला हे दिसून येईल. काँग्रेसच्या आमदारांची संख्या तुम्हाला पूर्वीऐवढीच दिसून येईल, असा दावा आमदार अर्जुन सिंग यांनी केला आहे.

भोपाळ : काठावरचे बहुमत मिळवत साधारण सव्वा वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारमधील २२ आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत राजीनामे दिल्याने कमलनाथ सरकार अल्पमतात गेले आहे. राज्यपालांच्या कार्यालयाने १९ आमदारांचे राजीनामे मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. 

सरकार अल्पमतात गेल्याने काय पावले उचलायची, यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चर्चा झाल्यावर कमलनाथ यांनी सरकारला धोका नसल्याचा दावा केला. काँग्रेस आमदार अर्जुन सिंग यांनी ज्योतिरादित्य शिंदेंच्या काँग्रेस सोडण्याने काहीही फरक पडणार नसल्याचे म्हटले आहे. मध्य प्रदेशातील काँग्रेस आणि कमलनाथ यांचे सरकार कायम राहणार आहे. येत्या 16 मार्च रोजी तुम्हाला हे दिसून येईल. काँग्रेसच्या आमदारांची संख्या तुम्हाला पूर्वीऐवढीच दिसून येईल, असा दावा आमदार अर्जुन सिंग यांनी केला आहे. तसेच राजा-महाराजांचा काळ जावून कित्येक दिवस उलटले आहेत. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या जाण्याने सरकारवर काहीही परिणाम होणार नसल्याचे अर्जुन सिंग यांनी म्हटले आहे. 

230 सदस्यीय मध्यप्रदेश विधानसभेत दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे 228 सदस्यांपैकी 22 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे विधानसभा सदस्य संख्या केवळ 206 वर येणार आहे. आता बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला 104 आमदार लागणार आहेत. तर काँग्रेसकडे केवळ 92 आमदार राहणार आहेत. काँग्रेसला सध्या तरी सपा, बसपाच्या आमदारांचा पाठिंबा आहे. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश