कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 10:14 IST2025-09-06T10:14:09+5:302025-09-06T10:14:46+5:30
Red Fort News: ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व असलेल्या दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लाल किल्ल्याच्या आवारातून कोट्यवधी रुपये किंमत असलेला एक हिरेजडित सुवर्णकलश चोरीला गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदली, लाल किल्ल्यात मौल्यवान वस्तूवर चोरट्याचा डल्ला, कोट्यवधीमध्ये आहे किंमत
ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व असलेल्या दिल्लीतील लाल किल्ल्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लाल किल्ल्याच्या आवारातून कोट्यवधी रुपये किंमत असलेला एक हिरेजडित सुवर्णकलश चोरीला गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लाल किल्ल्यामध्ये जैन धर्माचा एक कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी तिथे कोट्यवधी रुपये किंमत असलेला एक सुवर्णकलश ठेवण्यात आला होता. दरम्यान, चोरट्यांनी संधी साधून या कलशावर डल्ला मारला. आता पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी सुरू केली आहे.
ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्व असल्याने लाल किल्ला परिसर हा अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे या वास्तूच्या संरक्षणासाठी सीआयएसएफचे जवान तैनात असतात. दरम्यान, लाल किल्ल्यामध्ये जैन धर्माच्या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी सुमारे ७६० ग्रॅम वजन असलेला सोन्याचा हिरेजडित कलश तिथे ठेवण्यात आला होता. या कलशावर चोरट्यांनी आधीपासूनच डोळा ठेवला असावा आणि संधी साधून त्याच्यावर डल्ला मारला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असतानाही चोरट्यांनी चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.