सरकारी अधिकाऱ्याने शेजाऱ्याच्या घरावर २ कोटी रुपये फेकले; दक्षता पथकाने रंगेहात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 01:16 PM2023-06-23T13:16:29+5:302023-06-23T13:17:17+5:30

एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरातच मोठं घबाड सापडलं आहे.

throwing rs 2 crore on neighbor terrace vigilance team caught government official red handed | सरकारी अधिकाऱ्याने शेजाऱ्याच्या घरावर २ कोटी रुपये फेकले; दक्षता पथकाने रंगेहात पकडले

सरकारी अधिकाऱ्याने शेजाऱ्याच्या घरावर २ कोटी रुपये फेकले; दक्षता पथकाने रंगेहात पकडले

googlenewsNext

सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप अनेकदा होतात. काही अधिकाऱ्यांना आतापर्यंत रंगेहातही पकडले आहे. सध्या अशीच एक घटना ओडिशामधून समोर आली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरातून २ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळी राज्य दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ५०० रुपयांच्या नोटांच्या बंडलांसह पकडले. स्वत:ला वाचवण्यासाठी या अधिकाऱ्याने शेजाऱ्यांच्या घराच्या टेरेसवर पैसे फेकण्याचा प्रयत्न करत होता. 

मुकेश अंबानी उत्तर भारतातील FMGC मार्केटमध्ये धमाका करण्याच्या तयारीत, मिळणार स्वस्त ग्रोसरी

दक्षता अधिकार्‍यांनी सांगितले की, नबरंगपूर जिल्ह्याचे अतिरिक्त उपजिल्हाधिकारी म्हणून तैनात प्रशांत राऊतला पहाटेच्या छाप्यात भुवनेश्वरमधील दुमजली घरातून शेजाऱ्याच्या टेरेसवर चलनी नोटा फेकताना रंगेहात पकडण्यात आले.

अधिकाऱ्याने सांगितले की, "आम्ही अधिकाऱ्याच्या घरातून ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल जप्त केले.  त्याने अलीकडेच २००० रुपयांच्या नोटा ५०० रुपयांच्या चलनात बदलल्या आहेत. आम्ही आतापर्यंत त्याच्या घरातून २ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. आणखी काही असण्याची शक्यता आहे.

ओडिशा दक्षता टीममध्ये दोन अतिरिक्त एसपी, ७ डेप्युटी एसपी, ८ निरीक्षक आणि इतर कर्मचारी असतात. या नऊ पथके भुवनेश्वर, नबरंगपूर आणि भद्रक येथील नऊ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकत आहेत. राऊत यांच्यावर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे अनेक आरोप आणि तक्रारी आहेत. २०१८ मध्ये दक्षता विभागाने पंचायत कार्यकारी अधिकाऱ्याला १ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली होती. 

गेल्या वर्षी ओडिशा दक्षताने बेहिशोबी मालमत्तेशी संबंधित ८४ प्रकरणे नोंदवली. २०२२ हे वर्ष देशात सर्वाधिक आहे. सुमारे २०० सरकारी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.

Web Title: throwing rs 2 crore on neighbor terrace vigilance team caught government official red handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.