lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानी उत्तर भारतातील FMGC मार्केटमध्ये धमाका करण्याच्या तयारीत, मिळणार स्वस्त ग्रोसरी 

मुकेश अंबानी उत्तर भारतातील FMGC मार्केटमध्ये धमाका करण्याच्या तयारीत, मिळणार स्वस्त ग्रोसरी 

FMCG व्यवसाय वाढवण्यासाठी, तसंत बाजारपेठेचा मोठा हिस्सा काबीज करण्यासाठी अंबानींनी त्यांच्या ब्रँड इंडिपेंडन्सचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:47 PM2023-06-23T12:47:48+5:302023-06-23T12:49:02+5:30

FMCG व्यवसाय वाढवण्यासाठी, तसंत बाजारपेठेचा मोठा हिस्सा काबीज करण्यासाठी अंबानींनी त्यांच्या ब्रँड इंडिपेंडन्सचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय.

Mukesh Ambani prepares expand North India s FMGC market with cheaper groceries isha ambani brand independance | मुकेश अंबानी उत्तर भारतातील FMGC मार्केटमध्ये धमाका करण्याच्या तयारीत, मिळणार स्वस्त ग्रोसरी 

मुकेश अंबानी उत्तर भारतातील FMGC मार्केटमध्ये धमाका करण्याच्या तयारीत, मिळणार स्वस्त ग्रोसरी 

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी FMCG व्यवसाय वाढवण्यासाठी आणि बाजारपेठेचा मोठा हिस्सा काबीज करण्यासाठी त्यांच्या ब्रँड इंडिपेंडन्सचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. उत्तर भारतात त्यांनी हा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. मुकेश अंबानी यांची रिलायन्सची उत्तर भारतातील FMCG व्यवसायात आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि इतर कंपन्यांशी स्पर्धा होणार आहे.

रिलायन्सचा मेड फॉर इंडिया कंझ्युमर पॅकेज्ड गुड्स ब्रँज इंडिपेंडन्स मुकेश अंबानी यांनी उत्तर भारतात लाँच केला आहे. रिलायन्स रिटेल व्हेन्चर्सची कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिडेटनं आपले एफएमजीसी प्रोडक्ट पंजाब, हरयाणा, दिल्ली एनसीआर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि बिहारमध्ये लाँच करणार असल्याची घोषणा केली. 

इंडिपेंडन्स ब्रँडच्या अंतर्गत रिलायन्स कंन्झ्युमर प्रोडक्टनं धान्यापासून प्रोसेस्ड फूड आणि दैनंदिन आवश्यक वस्तूंची विक्री गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी सुरू केली. रिलायन्स रिटेलच्या एफएमजीसी कंपनीनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात इंडिपेंडन्स ब्रँड गुजरातमध्ये लाँच केला होता.

काय म्हटलंय कंपनीनं?
भारताच्या एफएमजीसी ग्राहकांना स्थानिक स्तरावर विकसित करण्यात आलेले क्लालिटी प्रोडक्ट स्वस्त किंमतीत दिले जात असल्याचं कंपनीनं म्हटलं. वाढत्या लोकसंख्येला आता विश्वासू ब्रँडची गरज आहे आणि रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट त्यांना स्वस्त किंमतीत विश्वासू प्रोडक्ट उपलब्ध करुन देत एफएमजीसी व्यवसायाच्या मोठ्या भागापर्यंत पोहोचण्याची योजना आखत असल्याचंही कंपनीनं नमूद केलं.

Web Title: Mukesh Ambani prepares expand North India s FMGC market with cheaper groceries isha ambani brand independance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.