दिल्लीत भरधाव कारचा थरार, फुटपाथवर उभ्या असलेल्या 3 मुलांना चिरडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 17:50 IST2022-12-18T17:50:01+5:302022-12-18T17:50:34+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालवणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली.

दिल्लीत भरधाव कारचा थरार, फुटपाथवर उभ्या असलेल्या 3 मुलांना चिरडलं; VIDEO पाहून उडेल थरकाप!
दिल्लीतील गुलाबीबाग परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रविवारी सकाळच्या सुमारास एका भरधाव कारने तीन मुलांना चिरडले. या घटनेनंतर मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुलाबीबाग येथील शाळेजवळ ही घटना घडली. या अपघातात मुले जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालवणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, प्रताप नगर येथील रहिवासी गजेंद्र (३०) हा कार चालवत होता, लीलावती शाळेजवळ येताच त्याचे कारवरील नियंत्रण सुटले.
एकाची प्रकृती गंभीर -
उत्तर दिल्लीचे डीसीपी सागर सिंह कलसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कार अनियंत्रित झाल्यानंतर, फूटपाथवर असलेल्या मुलांना धडकली. या अपघातात तीन मुले जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेली दोन मुले (एक 10 वर्षे आणि एक 4 वर्षे) धोक्याबाहेर आहेत. तर एका ६ वर्षाच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.
दिल्लीत भरधाव कारचा थरार, फुटपाथवर उभ्या असलेल्या 3 मुलांना चिरडलं#Delhiaccident#caraccidentpic.twitter.com/pZZvFbcV3Z
— Lokmat (@lokmat) December 18, 2022
पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. या अपघातात जखमी झालेल्या अंशू नावाच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजन आग विझवत असताना एक कार आली आणि तिने त्यांना उडवले. जखमी मुलाच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, ही मुलं रस्त्याच्या कडेला असलेल्या फूटपाथवर शेकत होते. तेवढ्यात एका भरधाव कारने त्यांना चिरडले.