शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

अमरनाथ हल्ल्यामागील 3 दहशतवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2017 6:33 PM

गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे.

जम्मू-काश्मीर, दि. 6 - गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस महासंचालक मुनीर खान यांनी आज याबाबतची माहिती दिली. अटक करण्यात आलेले तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे असून, या हल्लाचा मास्टर माईंड अबू इस्माईल आणि इतर तीन दहशतवादी अजूनही फरार आहेत. विशेष म्हणजे, यातील दोन दहशतवादी पाकिस्तानचे, तर एक काश्मिरी आहे.दहशतवाद्यांच्या निशाण्यावर सीआरपीएफ आणि अमरनाथ यात्रेकरुंची बस होती. सुरुवातीला हा हल्ला 9 जुलै रोजी घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा मानस होता. पण त्या दिवशी सीआरपीएफ आणि अमरनाथ यात्रेकरुंची कोणतीही बस अमरनाथला जाणाऱ्या मार्गावरुन गेली नाही. त्यामुळे दहशतवाद्यांनी दुसऱ्याच दिवशी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यामागील तिन्ही आरोपींना पकडण्यात आले असून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. यात्रेकरूंच्या बससाठी दहशतवाद्यांनी शौकत आणि सीआरपीएफच्या गाडीसाठी बिलाल हा कोडवर्ड वापरला होता, हा पूर्णपणे दहशतवादी हल्लाच होता असेही मुनीर यांनी सांगितले.अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 19 भाविक जखमी झाले होते. या हल्ल्या मागे पाकिस्तानचा दहशतवादी मौलाना मसूद अजहर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. कारण, मसूदनं काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ प्रसारित केला होता. त्या टेपद्वारे भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याचे संकेत दिले होते.नियमांचे उल्लंघनयात्रेकरूंच्या ज्या बसवर हल्ला झाला ती गुजरातमधील बलसाड येथील होती. प्रवास सुरु करताना अनेक वाहने एकदम निघाली होती व त्यांच्यासोबत सुरक्षा दलांची सुरक्षा व्यवस्था होती. ही बस जेवणासाठी रस्त्यात मध्येच थांबली व इतरांपासून वेगळी पडली. नेमकी हिच संधी साधून अतिरेक्यांनी हा हल्ला केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार यात्रेतील कोणत्याही वाहनाने सायंकाळी सात नंतर महामार्गावरून जाऊ नये, असा नियम आहे. परंतु बसच्या चालकाने सातनंतर बस महामार्गावरून नेऊन या नियमाचे उल्लंघन केले.केंद्रीय राखीव पोलीस दलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार हल्ला झालेली ही बस यात्रेच्या अधिकृत वाहन ताफ्यापैकी नव्हती व तिची अमरनाथ यात्रा बोर्डाकडे रीतसर नोंदणीही केलेली नव्हती. ही बस अमरनाथ यात्रापूर्ण केलेल्या यात्रेकरूंना बलताल येथून परत घेऊन येत होती.१७ वर्षांपूर्वीही झाले होते हत्याकांडअमरनाथ यात्रेवर झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. याआधी सन २००० च्या यात्रेत जुलै महिन्यात अतिरेक्यांनी यात्रेकरूंच्या पहेलगाम येथील बेस कॅम्पवर बॉम्ब फेकून व बेछुट गोळीबार करून केलेल्या हल्ल्यात २७ यात्रेकरू ठार तर ३६ जखमी झाले होते. नंतर सुरक्षा दलांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन दहशतवादी मारले गेले होते.