अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 17:04 IST2019-09-05T17:02:34+5:302019-09-05T17:04:35+5:30
गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी एक तीन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे.

अहमदाबादमध्ये तीन मजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू
अहमदाबाद - गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी (5 सप्टेंबर) दुपारी एक तीन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादच्या अमरायवाडी परिसरात तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य वेगाने सुरू आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबले असण्याची शक्यता असल्याने ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याआधी काही दिवसांपूर्वी नवी दिल्ली येथे सीलमपूर परिसरात चार मजली इमारत कोसळली होती. त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता तर काही जण जखमी झाले होते.
Gujarat: A three-storey building collapses in Amraiwadi area in Ahmedabad. Rescue operation underway. pic.twitter.com/jRtU4Tae7h
— ANI (@ANI) September 5, 2019