शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

तीन अतिरेकी जेरबंद , काश्मीरमध्ये शस्त्रे व स्फोटके जप्त; लष्कराने केले दहशतवाद्यांचे मोड्यूल उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 1:13 AM

सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातून तीन अतिरेक्यांना अटक करून एका अतिरेकी गटाचा पर्दाफाश केला आहे. मागच्या तीन दिवसांत दक्षिण काश्मीरमधून लष्कर-ए-तैयबाचे दोन आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या एका अतिरेक्याला अटक करण्यात आली

श्रीनगर : सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातून तीन अतिरेक्यांना अटक करून एका अतिरेकी गटाचा पर्दाफाश केला आहे. मागच्या तीन दिवसांत दक्षिण काश्मीरमधून लष्कर-ए-तैयबाचे दोन आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या एका अतिरेक्याला अटक करण्यात आली, असे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितले.दोन दहशतवाद्यांनी १४ आॅक्टोबर रोजी काझीगुंड भागातील कुंड येथे एका व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या खाजगी सुरक्षारक्षकांकडील शस्त्रे हिसकावण्यासाठी गोळीबार केला; परंतु स्थानिक लोकांनी एकच आरडाओरड केल्याने त्यांना पळ काढावा लागला. ही माहिती मिळताच पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने नाकेबंदी करून मोटारसायकलस्वार दोन अतिरेक्यांना जेरबंद केले.खुर्शीद अहमद डार आणि हाजिक राथेर अशी या दोघांची नावे आहेत. एक पिस्तूल, काही स्फोटके आणि काही जिवंत काडतुसे त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. या दोघांचा लष्कर-ए-तैयबाशी संबंध आहे. एका वैद्यकीय संस्थेत काम करणारा अतिरेकी रमीज याटू यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्या घरातून शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली. शनिवारी दमहाल हांजीपुरा येथे त्याने पोलीस वाहनावरील हल्ल्यासाठी अतिरेक्यांना मदत केली होती. या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला होता. हिज्बुुल मुजाहिदीन या संघटनेने हा हल्ला केला होता, असे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितले. शुक्रवारीही पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या एका अतिरेक्याला अटक केली होती. मागच्या महिन्यात मंत्री नईम अख्तर यांच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता.  स्वत:हून शरण यावेस्थानिक अतिरेक्यांनी स्वत:हून शरणागती पत्करून शस्त्रांचा त्याग करावा. त्यांनी तसे केल्यास पुनर्वसन करण्याची व त्यांना संरक्षण देण्याचीआवश्यक ती मदत करण्याची आमची तयारी आहे, असेही पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरterroristदहशतवादीTerrorismदहशतवादIndian Armyभारतीय जवान