अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 22:48 IST2025-07-14T22:46:43+5:302025-07-14T22:48:04+5:30

कुठल्याही संशयित व्यक्तीवर अथवा कृतीवर लक्ष ठेवण्यासंदर्भात टास्क फोर्सला निर्देश देण्यात आले आहेत. SGPC के मुख्य सचिव कुलवंत सिंह मनण यांनी याची पुष्टी केली आहे.

Threat to blow up Amritsar's Golden Temple with RDX, a stir after email | अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ

अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ

अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी एका अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे दिली आहे. मेल मिळताच शहरात खळबळ उडाली आहे. यानंतर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (एसजीपीसी) आपल्या पातळीवर, सुवर्ण मंदिर, परिक्रमा, लंगर भवन आणि सर्व धर्मशाळांची सुरक्षा कडक केली आहे. टास्क फोर्सकडून सतत तपासणी सुरू आहे. 

कुठल्याही संशयित व्यक्तीवर अथवा कृतीवर लक्ष ठेवण्यासंदर्भात टास्क फोर्सला निर्देश देण्यात आले आहेत. SGPC के मुख्य सचिव कुलवंत सिंह मनण यांनी याची पुष्टी केली आहे. तसेच, कोतवाली पोलीस स्टेशन आणि अमृतसर पोलीस आयुक्तांनाही यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे, असेही मनण यांनी सांगितले.

यासंदर्भात बोलताना, एसजीपीसीचे प्रमुख हरजिंदर सिंग धामी म्हणाले, संबंधित प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीच्या तपासानुसार, कुणीतरी जाणूनबुजून दहशत पसरवण्यासाठी अशा प्रकारचा ईमेल केला असल्याची शक्यता आहे. 

 धमकीच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षा संस्था पूर्णपणे सतर्क -
मात्र, धमकीच्या पार्श्वभूमीवर, अमृतसर पोलीस आणि इतर सुरक्षा संस्था पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. सुवर्ण मंदिर आणि आसपासच्या परिसरात सीसीटीव्ही निगराणी वाढवण्यात आली आहे. याशिवाय भाविक आणि पर्यटकांचे सखोल स्कॅनिंग केले जात आहे. अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरीक आणि भाविकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
 

Web Title: Threat to blow up Amritsar's Golden Temple with RDX, a stir after email

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.