शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

अमरनाथ यात्रेला धोका? तब्बल 450 दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 6:39 PM

पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी 11 लॉन्चिंग पॅड उभारले

श्रीनगर: काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ तब्बल 450 दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. गुप्तचर विभागानं याबद्दलचा अहवाल केंद्र सरकारला पाठवला आहे. दहशतवाद्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये 11 लॉन्चिंग पॅड्स तयार केले असून त्यांच्याकडून अमरनाथ यात्रेला लक्ष्य केलं जाऊ शकतं, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून केंद्र सरकारला देण्यात आली आहे.  गुप्तचर यंत्रणांनी केंद्राला दिलेल्या अहवालात सीमेपलीकडील दहशतवाद्यांच्या वाढत्या हालचालींचा उल्लेख आहे. 'पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा यांच्याकडून अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याची तयारी सुरू आहे,' असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 28 जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. 'केंद्र सरकारनं रमझानच्या पवित्र महिन्यात दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवली. यामुळे दहशतवादी संघटनांना नव्या दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी, शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव करण्यासाठी बराच कालावधी मिळाला,' असं गुप्तचर यंत्रणांनी अहवालात म्हटलं आहे. 'आज तक'नं सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर प्रथमच दहशतवाद्यांची मोठी हालचाल पाकव्याप्त काश्मीरकडे पाहायला मिळते आहे. भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राईकवेळी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड्स उद्ध्वस्त केले होते. मात्र आता दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवण्यात आल्यानं लॉन्चिंग पॅड्स उभारण्यासाठी दहशतवाद्यांना पुरेसा कालावधी मिळाला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्याच्या वृत्ताला गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानंही दुजोरा दिला आहे.  

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा