शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सीमाप्रश्नी लोकसभेत सेना-भाजपात जुंपली

By admin | Updated: July 31, 2014 03:31 IST

शून्य तासात शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी अतिशय आक्रमकरीत्या हा मुद्दा लावून धरला़ कर्नाटक सरकारविरुद्ध शिवसेना खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली़ कर्नाटकच्या भाजपा खासदारांनी याला विरोध केला़

नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आज बुधवारी लोकसभेत शिवसेना-भाजपा आमने-सामने आल्याचे चित्र दिसले़ महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील बेळगाव जिल्ह्याच्या येळ्ळूर गावात कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीच्या मुद्यावर शिवसेना खासदारांनी आक्रमक पवित्रा घेत, सभागृह डोक्यावर घेतले़ या गोंधळामुळे प्रश्नोत्तराचा तास बाधित झाला आणि सभागृहाचे कामकाज सुमारे ५० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले़शून्य तासात शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी अतिशय आक्रमकरीत्या हा मुद्दा लावून धरला़ कर्नाटक सरकारविरुद्ध शिवसेना खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली़ कर्नाटकच्या भाजपा खासदारांनी याला विरोध केला़ यामुळे सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले़येळ्ळूरच्या मराठी भाषिकांनी उभारलेला ‘महाराष्ट्र राज्य - येळ्ळूर’ फलक गत रविवारी कर्नाटक पोलिसांनी जमीनदोस्त केला होता़ या कारवाईला विरोध करण्यासाठी गेलेल्या महिलांवरही पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला़ पाठोपाठ येळ्ळूर गावात शिरून पोलिसांनी गावातील प्रत्येकाच्या घरात घुसून अक्षरश: धुडगूस घातला. हे गंभीर असल्याचे सावंत म्हणाले़ कर्नाटक राज्यात मराठी लोकांवर पोलीस अत्याचार करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला़ यावर कर्नाटकचे भाजप खासदार प्रल्हाद जोशी यांनी आक्षेप नोंदवला़ बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे आणि हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, असे ते म्हणाले़ येळ्ळूर गावात काही उपद्रवींनी एक फलक लावला आणि हे गाव महाराष्ट्राचे असल्याचा दावा केला़ प्रत्यक्षात हे गाव कर्नाटकचे आहे़ हे फलक हटवण्यात आले़ मात्र काही लोकांनी ते पुन्हा लावले़ यामुळेच पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला, अशी भूमिका त्यांनी घेतली़ यामुळे शिवसेना खासदार संतापले आणि त्यांनी कर्नाटक सरकार हाय हायची घोषणाबाजी सुरू केली़ (लोकमत न्यूज नेटवर्क)