हजारो किलोमीटरचा प्रवास, पाइपलाइन नाही! कतारचा गॅस भारतात पोहोचतो तरी कसा? जाणून घ्या 'हे' तंत्रज्ञान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:17 IST2026-03-10T14:03:01+5:302026-03-10T15:17:58+5:30

इराण युद्धादरम्यान, आता परदेशातून येणाऱ्या गॅसबद्दल चर्चा वाढत आहे. कतारसारख्या देशांमधूनही भारतात गॅस आयात केला जातो.

Thousands of kilometers of travel, no pipeline! How does Qatar's gas reach India? Know this technology | हजारो किलोमीटरचा प्रवास, पाइपलाइन नाही! कतारचा गॅस भारतात पोहोचतो तरी कसा? जाणून घ्या 'हे' तंत्रज्ञान

हजारो किलोमीटरचा प्रवास, पाइपलाइन नाही! कतारचा गॅस भारतात पोहोचतो तरी कसा? जाणून घ्या 'हे' तंत्रज्ञान

मागील काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. इराणने 'हार्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) बंद केल्याचा परिणाम आता जगभरात दिसू लागला असून, अनेक देशांमध्ये नैसर्गिक वायू, पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवू लागला आहे. भारतातही या युद्धामुळे गॅस टंचाईच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः केंद्र सरकारने 'अत्यावश्यक वस्तू कायदा' (ECA) लागू केल्यापासून भारताचा गॅस पुरवठा नेमका कुठून आणि कसा होतो, याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे.

भारताची गॅसवरील भिस्त किती?

भारत आपल्या एकूण नैसर्गिक वायूच्या गरजेपैकी सुमारे ५०% वायू आयात करतो. या आयातीपैकी ५० टक्क्यांहून अधिक पुरवठा कतार आणि युएई (UAE) या आखाती देशांकडून केला जातो. हा सर्व पुरवठा हार्मुझच्या सामुद्रधुनीतून समुद्रमार्गे भारतात येतो.

पाइपलाइनशिवाय गॅसचा प्रवास कसा होतो?

हजारो किलोमीटरचे अंतर असूनही पाइपलाइनशिवाय हा गॅस भारतात पोहोचवण्याची प्रक्रिया विज्ञानाचा अद्भूत चमत्कार आहे.

 द्रवीकरण (Liquefaction)

 प्रथम गॅस फील्डमधून नैसर्गिक वायू 'लिक्विफॅक्शन प्लांट'मध्ये पाठवला जातो. वायूचे आकारमान जास्त असल्याने तो थेट जहाजातून पाठवणे अशक्य असते. त्यामुळे हा वायू उणे १६२°C (-162°C) पर्यंत थंड केला जातो. या प्रक्रियेत वायूचे रूपांतर द्रवात होते, ज्याला LNG (Liquefied Natural Gas) म्हटले जाते. यामुळे गॅसचे आकारमान मूळ स्वरूपापेक्षा सुमारे ६०० पटीने कमी होते आणि वाहतूक सोपी होते.

क्रायोजेनिक टँकर जहाजे

 हा द्रव गॅस विशेष प्रकारच्या 'क्रायोजेनिक टँकर' जहाजांमध्ये भरला जातो. ही जहाजे म्हणजे एका प्रकारे महाकाय 'व्हॅक्यूम-इन्सुलेटेड' कंटेनर असतात. अतिशय कमी तापमानात (-९०°C ते -१६०°C) द्रव स्वरूपातील वायू सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी त्यांची खास रचना केलेली असते. ही जहाजे एकाच वेळी हजारो टन वायू घेऊन समुद्रमार्गे भारतात येतात.

भारतातील टर्मिनल्स

 हा गॅस भारतातील गुजरात (दाहेज), तामिळनाडू (एन्नोर) आणि महाराष्ट्र (जयगड) येथील विशेष टर्मिनल्सवर उतरवला जातो. येथे या LNG चे पुन्हा वायूत रूपांतर केले जाते किंवा विविध बॉटलिंग प्लांट्समध्ये पाठवले जाते. त्यानंतर तो सिलिंडरमध्ये भरून तुमच्या घरापर्यंत पोहोचवला जातो.

Web Title : कतार से बिना पाइपलाइन भारत पहुँचती है गैस: जानिए तकनीक।

Web Summary : वैश्विक तनाव के बीच, भारत कतर/यूएई से जहाजों के माध्यम से गैस आयात करता है। गैस को -162 डिग्री सेल्सियस पर द्रवीकृत किया जाता है, जिससे क्रायोजेनिक टैंकरों में परिवहन के लिए मात्रा कम हो जाती है। फिर इसे वितरण के लिए भारतीय टर्मिनलों पर पुन: गैसीकृत किया जाता है।

Web Title : Qatar's gas reaches India without pipelines: Liquefaction technology explained.

Web Summary : Amidst global tensions, India imports gas, mainly from Qatar/UAE, via ships. Gas is liquefied at -162°C, reducing volume for transport in cryogenic tankers. It's then regasified at Indian terminals for distribution.