पॅनकार्डशी संबंधित ही मोठी चूक पडू शकते महागात, भरावा लागेल १० हजार रुपये दंड, प्राप्तिकर विभागाचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2022 06:37 PM2022-09-11T18:37:59+5:302022-09-11T18:39:02+5:30

PAN card : भारतामध्ये पॅनकार्ड अनेक आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. पॅनकार्डच्या मदतीने अनेक आर्थिक कामं आटोपता येतात

This big mistake related to PAN card can be expensive, you have to pay a fine of Rs 10 thousand, warns the Income Tax Department | पॅनकार्डशी संबंधित ही मोठी चूक पडू शकते महागात, भरावा लागेल १० हजार रुपये दंड, प्राप्तिकर विभागाचा इशारा 

पॅनकार्डशी संबंधित ही मोठी चूक पडू शकते महागात, भरावा लागेल १० हजार रुपये दंड, प्राप्तिकर विभागाचा इशारा 

Next

नवी दिल्ली - भारतामध्ये पॅनकार्ड अनेक आवश्यक कागदपत्रांपैकी एक आहे. पॅनकार्डच्या मदतीने अनेक आर्थिक कामं आटोपता येतात. प्राप्तिकर विभागानुसार पॅनकार्ड एक अल्फान्यूमरिक संख्या आहे. ती प्रत्येक व्यक्तीसाठी एक अनिवार्यता आहे. मात्र बहुतांश लोकांना पॅनकार्डचे महत्त्व कळत नाही. पॅनकार्डबाबत काही महत्त्वपूर्ण विषय हे लक्षात घेतले पाहिजेत. या अत्यावश्यक विषयाबाबत पॅनकार्डबाबत एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे.  

भारतामध्ये लोकांसाठी पॅनकार्ड जारी केले जातात. मात्र कुठल्याही व्यक्तीचे एकच पॅनकार्ड जारी केले जाते. तसेच कुठलीही व्यक्ती एकापेक्षा अधिक पॅनकार्ड, मल्टिपल पॅनकार्ड किंवा डुप्लिकेट पॅनकार्ड बाळगू शकत नाही. असे केल्यास त्या व्यक्तीला दंड भरावा लागू शकतो. पॅनकार्डमध्ये पॅन नंबर आणि कार्डधारकाचं जन्मतारीख आणि फोटो असतो.

प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार एक व्यक्ती एकपेक्षा अधिक पॅनकार्ड बाळगू शकत नाही. जर कुठल्याही व्यक्तीला पॅन मिळाल्यानंतर तो दुसऱ्या पॅनकार्डसाठी अर्ज करू शकत नाही. असे केल्यास त्या व्यक्तीला एका पेक्षा अधिक पॅनकार्ड बाळगल्याप्रकरणी प्राप्तिकर अधिनियम १९६१च्या कलम २७२ बी अन्वये १० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

मात्र या कारवाईपासून वाचण्याचा एक पर्याय आहे. जर कुठल्याही व्यक्तीला एकापेक्षा अधिक पॅनकार्ड मिळाले तर त्यांनी ते अतिरिक्त पॅनकार्ड त्वरित सरेंडर केले पाहिजे. अशा परिस्थितीत कुठल्याही दंडापासून वाचता येईल.  

Web Title: This big mistake related to PAN card can be expensive, you have to pay a fine of Rs 10 thousand, warns the Income Tax Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.