चोराला आराम महागात पडला; रेल्वे स्टेशनवरुन थेट तुरुंगात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 11:33 IST2018-05-07T11:33:05+5:302018-05-07T11:33:05+5:30

काहीच न करता चोर पोलिसांच्या हाती लागला

thief was sleeping at station with looted valuables arrested | चोराला आराम महागात पडला; रेल्वे स्टेशनवरुन थेट तुरुंगात रवानगी

चोराला आराम महागात पडला; रेल्वे स्टेशनवरुन थेट तुरुंगात रवानगी

चेन्नई: रेल्वे स्थानकावर आराम करणं एका चोराला चांगलंच महागात पडलंय. सैदापेट रेल्वे स्थानकावर आराम करणारा चोर रेल्वे पोलिसांच्या अगदी अलगद हाती लागला. यानंतर चोराची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली. या चोराकडून सोन्याची अंगठी, दोन झुमके आणि काही कपडे ताब्यात घेतले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरात हात साफ केल्यावर चोर रेल्वे स्थानकात येऊन झोपला होता. सकाळी सव्वा सहा वाजता गस्त घालण्यासाठी आलेल्या रेल्वे पोलिसांनी या चोराला उठवलं. पोलिसांना पाहताच चोर पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला पकडलं. यानंतर त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे दागिने आणि कपडे सापडले. 'सुरुवातीला त्यानं ते दागिने त्याच्या पत्नीचे असल्याचं सांगितलं. मात्र पोलिसांना पाहून पळालास का, याचं उत्तर त्याला देता आलं नाही. त्यानंतर आणखी चौकशी केल्यावर त्यानं चोरीची कबुली दिली,' अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली. 

रेल्वे पोलिसांनी या चोराला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. यानंतर पोलिसांनी ज्या घरातून दागिने आणि कपडे चोरीला गेले, ते घर गाठलं. यानंतर पोलिसांना समजलेली माहिती धक्कादायक होती. ज्या घरातून दागिने चोरीला गेले होते, त्या कुटुंबाला याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. पोलीस दागिन्यांसह घरी पोहोचल्यावर त्यांना या घटनेची माहिती मिळाली. आपल्या घरातून दागिने आणि कपडे चोरीला गेल्याचं या कुटुंबाच्या तेव्हा लक्षात आलं. 
 

Web Title: thief was sleeping at station with looted valuables arrested