शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम मशिदीत शस्त्रास्त्रं ठेवतात, त्यांना जागा दाखवणार, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:24 IST

कर्नाटकातल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार रेणुकाचार्य यांनी मुस्लिमांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे.

ठळक मुद्देकर्नाटकातल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार रेणुकाचार्य यांनी मुस्लिमांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. देवनागरेमध्ये एका रॅलीला संबोधित करताना रेणुकाचार्य यांनी मुस्लिमांवर गंभीर आरोप केला आहे.मुस्लिम लोक मशिदीमध्ये शस्त्रास्त्रं जमवून ठेवतात. मुस्लिमांना मी त्यांची जागा दाखवून देणार आहे.

बंगळुरूः कर्नाटकातल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार रेणुकाचार्य यांनी मुस्लिमांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं आहे. देवनागरेमध्ये एका रॅलीला संबोधित करताना रेणुकाचार्य यांनी मुस्लिमांवर गंभीर आरोप केला आहे. मुस्लिम लोक मशिदीमध्ये शस्त्रास्त्रं जमवून ठेवतात. मुस्लिमांना मी त्यांची जागा दाखवून देणार आहे. राजकारण काय असतं ते लवकरच समजेल, असा धमकीवजा इशाराच भाजपाच्या कर्नाटकातील आमदारानं मुस्लिमांना दिला आहे. त्यामुळे कर्नाटकातल्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. देवनागरेच्या होनाली येथे सोमवारी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुस्लिम समुदायातील लोक मशिदीत नमाज पठण करण्याऐवजी शस्त्रास्त्रं गोळा करून ठेवतात. इथे काही जण देशद्रोही आहेत. तुम्ही लोक मशिदीत बसता आणि फतवे काढता?, मशिदीत काय तर शस्त्रास्त्रं गोळा केली जात आहेत. त्यासाठी तुम्हाला मशीद हवी आहे काय?, जर तुम्हाला असंच काही तरी करायचं असल्यास ठीक आहे. मी माझं राजकारण करत राहीन, असंही रेणुकाचार्य म्हणाले आहेत. रेणुकाचार्य हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याजवळचे समजले जातात. रेणुकाचार्य पुढे म्हणाले, मी मुस्लिमांसाठी मिळालेला निधी हिंदूंवर खर्च करण्यासाठी अजिबात मागे-पुढे पाहणार नाही. मी तालुक्यात मुस्लिमांसाठी मिळालेला निधी हिंदूवर खर्च करणार आहे. भाजपाचे आमदार एम. पी. रेणुकाचार्च यांना येडियुरप्पा सरकारमध्ये कॅबिनेटचा दर्जा मिळालेला आहे. रेणुकाचार्य हे वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असतात. रेणुकाचार्य यांच्या आधी भाजपाचे आमदार सोमशेखर रेड्डी यांनीसुद्धा बेल्लारीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ मुस्लिम समुदायाविरोधात विधान केलं होतं. आम्ही 80 टक्के आहोत, तुम्ही फक्त 17 टक्के आहात, विचार करा, जर सीएए लागू झाला तर तुमचे काय हाल होतील?, सावध राहा, असंही सोमशेखर रेड्डी म्हणाले होते. 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारण