शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 18:37 IST

ओवेसी यांनी एक्स अकाउंटवर गुरुग्रामच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एका आदेशाचा फोटो पोस्ट करत म्हटले आहे, "पोलिसांना केवळ विशिष्ट भाषा बोलत असल्याने लोकांना ताब्यात घेण्याचा अधिकार नाही. ही सामूहिक अटक बेकायदेशीर आहेत."

हरियाणा आणि आसामसह देशातील अनेक राज्यांमध्ये बंगाली भाषिक मुस्लिम लोकांना ताब्यात घेतले जात आहे. यावरून आता  देशातील राजकारण तापताना दिसत आहे. दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख तथा हैदराबादचे लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मोठे विधान केले आहे. "या लोकांना विनाकारण बेकायदेशीर नागरिक म्हटले जात आहे, ते भारतीय नागरिक आहेत, असे म्हणत, ओवेसी यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. याच वेळी त्यांनी पोलिसांवर पक्षपात आणि अत्याचाराचा आरोपही केला.

एआयएमआयएम प्रमुख ओवेसी यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे, "भारताच्या विविध भागात पोलिस बंगाली भाषिक मुस्लिम नागरिकांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेत आहेत आणि त्यांच्यावर बांगलादेशी असल्याचा आरोप करत आहेत. भारतीय नागरिकांना बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जात असल्याच्या चिंताजनक बातम्या आल्या आहेत. हे सरकार कमकुवत लोकांशी कठोरपणे वागते."

पुढे ओवैसी म्हणाले, "ज्यांना बेकायदेशीर स्थलांतरित म्हटले जात आहे ते सर्वात गरीब आहेत, यातील बहुतेक झोपड्यांमध्ये राहतात. हे लोक घरकाम, सफाई आणि कचरा वेचण्याचे काम करतात. त्यांना वारंवार लक्ष्य केले जात आहे, कारण ते पोलिसांच्या अत्याचारांना आव्हान देऊ शकत नाहीत."

ओवेसी यांनी एक्स अकाउंटवर गुरुग्रामच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एका आदेशाचा फोटो पोस्ट करत म्हटले आहे, "पोलिसांना केवळ विशिष्ट भाषा बोलत असल्याने लोकांना ताब्यात घेण्याचा अधिकार नाही. ही सामूहिक अटक बेकायदेशीर आहेत."

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBangladeshबांगलादेशAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनPoliceपोलिस