'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 08:40 IST2025-12-29T08:39:43+5:302025-12-29T08:40:17+5:30
अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा दार यांनी केला.

'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात भारताने दिलेले धक्के आता पाकिस्तान स्वीकारू लागला आहे. काही दिवसापूर्वी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी हल्ल्या झाल्याचे मान्य केले. यावेळी दोन देशांची नावे घेत त्या देशांनी भारतासोबत बोलण्याची इच्छा व्यक्त केल्याचे म्हटले आहे. भारताने गातील कोणत्याही नेत्याने भारताला संघर्षविराम थांबवण्यासाठी सांगितले नव्हते असे स्पष्ट केले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने ७ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर'ची सुरुवात केली होती.
अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा दार यांनी केला.
भीषण काळरात्र! टाटा-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
१० मे रोजी रुबियो यांचा त्यांना सकाळी ८ वाजून १७ मिनिटांनी फोन आला होता. दार यांच्या म्हणण्यानुसार, तेव्हा अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले होते की, भारत संघर्षविरामासाठी तयार आहे, पण पाकिस्तान मानेल का? दार यांनी सांगितले, 'मी म्हटले की आम्हाला कधीही युद्ध नको आहे.'
दार म्हणाले, नंतर फैसल यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि भारताशी बोलण्यासाठी परवानगी मागितली होती. तसेच दावा केला की नंतर फैसल यांनी पुष्टी दिली होती की युद्धविरामावर सहमती झाली आहे.
दरम्यान, भारताने आधीच युद्धविरामात कोणत्याही तिसऱ्या देशाची भूमिका नव्हती असे सांगितले आहे. जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यासाठी सांगितले नाही. पाकिस्तानने ऑपरेशन थांबवण्याची विनंती केली होती, असा दावा भारताने केला होता.
याआधी जूनमध्ये भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले होते की, भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारली नाही.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविराम दोन्ही देशांच्या चर्चेतून झाला आहे,असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
मिस्री यांनी सांगितले होते, 'पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितले आहे की या काळात भारत आणि अमेरिका व्यापार करार किंवा भारत आणि पाकिस्तानमधील अमेरिकेची मध्यस्थी अशा विषयांवर कोणतीही चर्चा झाली नाही.'
त्यांनी सांगितले होते, 'लष्करी कारवाईचा संघर्षविराम भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट झाला होता आणि पाकिस्तानच्या विनंतीवरून झाला होता. पंतप्रधान मोदी यांनी भर देऊन सांगितले आहे की भारताने पूर्वीही मध्यस्थी स्वीकारली नव्हती आणि पुढेही कधीही स्वीकारणार नाही.'
ऑपरेशन सिंदूर
पहलगाम हल्ल्यात २६ नागरिकांच्या हत्येचा बदला म्हणून भारताने सात मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले, यामध्ये पाकिस्तान आणि त्याच्या ताब्यातील काश्मीरमधील दहशतवादी रचनांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमध्ये चार दिवस तीव्र संघर्ष झाला आणि १० मे रोजी लष्करी कारवाई थांबवण्याच्या सहमतीसह हा संघर्ष संपला.