शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीच्या काळात एकही बनावट नोट मिळाली नाही

By admin | Updated: January 22, 2017 05:11 IST

८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या नोटाबंदीच्या ५० दिवसांच्या काळात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अखत्यारीतील तपासी संस्थांनी देशभरात केलेल्या

नवी दिल्ली : ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या नोटाबंदीच्या ५० दिवसांच्या काळात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) अखत्यारीतील तपासी संस्थांनी देशभरात केलेल्या कारवाईत ५०० व एक हजार रुपयांची एकही बनावट नोट हस्तगत करण्यात आली नाही, अशी माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयाने संसदेच्या लोकलेखा समितीस दिली आहे.दि. ९ नोव्हेंबर ते ४ जानेवारी या काळात प्राप्तिकर विभागाने विविध ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये ४३४.३७ कोटी रुपयांच्या नव्या व बाद नोटा हस्तगत केल्या. पण या नोटा ज्यांच्याकडे मिळाल्या त्यांचा दहशतवाद्यांशी वा तस्करांशी संबंध असल्याची माहिती पुढे आलेली नाही, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.काळ््या पैशास आळा घालणे, बनावट चलनी नोटांचा प्रसार रोखणे आणि दहशतवाद्यांचा पैशचा स्रोत बंद करणे या तीन प्रमुख उद्देशांनी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. संसदीय समितीस दिलेली ही माहिती लक्षणीय आहे कारण यापैकी एकही उद्देश कदाचित सफल झाला नसावा, असे त्यावरून सूचित होते. नोटाबंदीमुळे नेमका किती काळा पैसा उघड झाला, हे सरकार वा रिझर्व्ह बँक अद्याप सांगू शकलेले नाही. त्यातच बनावट चलन आणि दहशतवाद्यांचा वित्तपुरवठा रोखण्यातही नोटाबंदीचा उपयोग झाला नसल्याचे कबूल केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)सरकारची आकडेवारी

प्राप्तिकर विभागाकडून 437 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त. त्यापैकी ११२ कोटी रुपयांच्या नव्या नोटा.महसूल गुप्तवार्ता विभागाच्या कारवाईत तीन कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त. हवाला दलालांवर ६३ ठिकाणी केलेल्या कारवाईत एक कोटीच्या जुन्या, २० लाखांच्या नव्या नोटा व ५० लाखांचे विदेशी चलन जप्त.गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल-डिसेंबर या काळात जप्त झालेल्या बेहिशेबी मालमत्तेत दुप्पट तर उघड झालेल्या बेहिशेबी उत्पन्नात 51% वाढ झाली आहे.