पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 15:16 IST2024-11-28T15:16:03+5:302024-11-28T15:16:48+5:30
पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पतीने घर पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. या घर जळत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पत्नीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात पतीने घरच पेटवलं; व्हिडीओ व्हायरल
Viral Video News: एका व्यक्तीने पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाल्यानंतर घरालाच आग लावली. मध्य प्रदेशातील बहादरपूर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. घर आगीत जळत असताना हा व्यक्ती बाहेर फिरत राहिला.
श्रीराम कुशवाह असे घराला आग लावणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे, रजनी कुशवाह असे त्याच्या पत्नीचे नाव आहे. श्रीराम आणि रजनी यांच्यात सतत छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद होत असतात.
ज्यादिवशी ही घटना घडली, त्यादिवशी दोघांमधील वाद जास्तच वाढला. श्राराम कुशवाहला राग अनावर झाला. त्याने घरातील सामान बाहेर काढले आणि त्यावर रॉकेल टाकले. त्यानंतर सामानाला आग लावली.
पत्नी से झगड़े के बाद पति ने र को लगाई आग
— NBT Hindi News (@NavbharatTimes) November 28, 2024
भोपाल में पत्नी से झगड़े के बाद पति ने घर को आग लगा दी, उसके बाद बाहर खड़ा होकर आराम से देखता रहा... वायरल हुआ वीडियो#bhopal#viralvideopic.twitter.com/1HwjSCarNQ
अवघ्या काही क्षणातच आगीचा भडका उडाला. घराला आग लागल्यानंतर श्रीराम कुशवाह बाहेर इतडे तिकडे फिरत राहिला. असं वाटत होतं की, त्याला घराला आग लावल्याचा कोणताही पश्चाताप नाही.
दरम्यान, संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. शेजाऱ्यांनी याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आले आणि त्यांनी आग विझवली. तोपर्यंत बहुतांश सामान जळून खाक झाले होते.
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर समोर आले की, श्रीराम कुशवाहनेच आग लावली होती. पोलीस श्रीराम आणि रजनीला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्या दोघांचंही समुपदेशन केलं. त्यानंतर दोघांनाही सोडून देण्यात आलं.