'गली गली मे शोर है, हिंदुस्थान का चौकीदार चोर है'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 21:09 IST2018-09-20T21:07:03+5:302018-09-20T21:09:16+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. राजस्थानमधील आयोजित सभेत बोलताना राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं.

'There is noise in the everywher in india, gali gali main shor hain, hindusthan ka chaukidar chor hain | 'गली गली मे शोर है, हिंदुस्थान का चौकीदार चोर है'

'गली गली मे शोर है, हिंदुस्थान का चौकीदार चोर है'

जयपूर - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र शब्दात टीका केली आहे. राजस्थानमधील आयोजित सभेत बोलताना राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होती की, मी या देशाचा पंतप्रधान नाही, तर मी या देशाचा चौकीदार आहे. राहुल यांनी मोदींच्या या वाक्याचा संदर्भ देत 'गली गली मे शोर है, हिंदुस्थान का चौकीदार चोर है', अशा शब्दात मोदींची खिल्ली उडवत त्यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे. 

देशातील नागरिकांच्या ह्रदयातून आज एकच आवाज बाहेर येत आहे. 'गली गली मे शोर है, हिंदुस्थान का चौकीदार चोर है', हाच तो देशातील नागरिकांचा आवाज असल्याचे राहुल यांनी म्हटले. राहुल गांधी सध्या मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी आयोजित संकल्प अभियानांतर्गत राहुल गांधी विविध राज्यांना भेटी देत आहेत. आज राजस्थान दौऱ्यातील सभेत बोलताना राहुल यांनी मोदींवर घणाघाती टीका केली. 


Web Title: 'There is noise in the everywher in india, gali gali main shor hain, hindusthan ka chaukidar chor hain