शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट नाही

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

२० फेब्रुवारीला विश्वासमत जिंकणार- जितनराम मांझी

२० फेब्रुवारीला विश्वासमत जिंकणार- जितनराम मांझी
नवी दिल्ली- बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी मी भाजपाच्या संगनमताने षडयंत्र रचत असल्याची अफवा पसरवून आमदारांना घाबरविण्याचा प्रयत्न नितीशकुमार यांच्या गोटातून केला जात आहे, असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी सोमवारी येथे केला. विरोधकांकडून राष्ट्रपती व राज्यपालांसमक्ष बनावट आमदारांची परेड करविण्यात आल्याचाही त्यांचा दावा आहे.
शासकीय कामानिमित्त आपण राजधानीत असून काही केंद्रीय मंत्री आणि राज्यपालांची भेट घेतल्याचे मांझी यांनी सांगितले. या भेटीगाठींनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मला पाठिंबा द्यायचा की नाही हे भाजपाने ठरवायचे आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा माझ्यावरील आरोप धादांत खोटा आहे. माझी इच्छा असती तर फार पूर्वीच तशी शिफारस केली असती. पण मी २० फेब्रुवारीला विश्वासमत जिंकणार आहे. सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा,असे आवाहन मांझी यांनी केले.
मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार देणारे मांझी यांना संयुक्त जनता दलातून (संजद) बडतर्फ करण्यात आले आहे.
संजदचे विधिमंडळ पक्ष नेते नितीशकुमार यांनी १३० आमदार त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला असून या सर्वांना घेऊन त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली होती. याकडे लक्ष वेधले असता यापैकी काही आमदार बनावट असल्याचा दावा मांझी यांनी केला.
मांझी भाजपाच्या तालावर नाचत असल्याचा आरोप संजदने रविवारी केला होता. संजद आणि त्याचे मित्र पक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि भाकपाने राज्यातील राजकीय अस्थिरतेसाठी राज्यपाल त्रिपाठी आणि भाजपाला जबाबदार धरले आहे.
(वृत्तसंस्था)