सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 20:16 IST2025-06-19T20:15:25+5:302025-06-19T20:16:35+5:30
सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहा यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर इतर आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
इंदूरच्या राजा रघुवंशी प्रकरणात पत्नी सोनम आणि राज कुशवाहा यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मेघालय न्यायालयाने पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांच्यासह पाचही आरोपींच्या रिमांडमध्ये वाढ केली आहे. शिलाँग जिल्हा सत्र न्यायालयाने राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी आणि इतर ३ आरोपी - आकाश राजपूत, विशाल सिंग चौहान आणि आनंद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वकील तुषार चंदा यांनी सांगितले की, सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहा यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर इतर आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
#WATCH मेघालय: शिलांग की जिला सत्र अदालत ने राजा रघुवंशी हत्याकांड में सोनम रघुवंशी और राज कुशवाह को 2 दिन की पुलिस हिरासत में तथा अन्य 3 आरोपियों - आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान और आनंद को 14 दिन की न्यायिक हिरासत में भेजा है।
— ANI_HindiNews (@AHindinews) June 19, 2025
वकील तुषार चंदा ने कहा, "सोनम रघुवंशी और राज कुशवाह… pic.twitter.com/i7UihUUV7T
बुधवारी मेघालय पोलिसांनी पाचही आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले. मेघालयात २३ मे रोजी राजा रघुवंशीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. राजा आणि सोनमचे ११ मे रोजी लग्न झाले. त्यानंतर दोघेही गुवाहाटी आणि नंतर शिलाँगला हनिमूनसाठी गेले. मेघालय पोलिसांच्या तपासात असे दिसून आले आहे की, २३ मे रोजी सोहरा येथील वेसाडोंग फॉल्सजवळ राजाला मारण्यासाठी एक नाही तर दोन दाओ शस्त्रे वापरण्यात आली होती. एक दाओ सापडला आहे तर दुसरा ज्या खड्ड्यात राजाचा मृतदेह टाकण्यात आला होता त्याच खड्ड्यात फेकण्यात आला होता. पोलीस अजूनही दुसऱ्या दाओचा शोध घेत आहेत.
सोनमसमोर राजाची हत्या
शिलाँगचे एसपी विवेक श्याम म्हणाले की, राजावर तीन हल्ले करण्यात आले. आकाश राजपूत, विशाल सिंग चौहान आणि आनंद कुर्मी या तिघांनी प्रत्येकी एक हल्ला केला. सोनम रघुवंशीने क्राईम सीन रिक्रिएशन दरम्यान कबूल केले की, ती हत्येच्या वेळी घटनास्थळी उपस्थित होती. तिने मारेकऱ्यांना पार्किंगमध्येच राजाला मारण्याचा संकेत दिला होता. पहिल्या हल्ल्यानंतर जेव्हा राजाला रक्त येऊ लागले तेव्हा सोनम ओरडत मागे सरकली. तिन्ही हल्लेखोरांनी मिळून राजाचा मृतदेह खड्ड्यात फेकून दिला.
इतकेच नाही तर मेघालय पोलिसांच्या तपासात संजय वर्मा हा राज कुशवाह असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी इंदूरमध्ये टॅक्सी ड्रायव्हरची चौकशी केली. सोनमने गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले, तेव्हा मेघालय पोलिसांनी तिला ट्रान्झिट रिमांडवर घेतले. त्यानंतर शिलाँग न्यायालयाने सोनमसह पाचही आरोपींना आठ दिवसांची रिमांड दिली.