पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-टीएमसी युती नाही, मुख्यमंत्री ममत बॅनर्जी आज ४२ उमेदवारांची घोषणा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 02:02 PM2024-03-10T14:02:53+5:302024-03-10T14:03:25+5:30

लोकसभा निवडणुका विरोधक एकत्रित लढणार असं बोलले जात होते, पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काँग्रेससोबत युती न करता लढणार असल्याचे बोलले जात आहे.

There is no Congress-TMC alliance in West Bengal, Chief Minister Mamat Banerjee will announce 42 candidates today | पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-टीएमसी युती नाही, मुख्यमंत्री ममत बॅनर्जी आज ४२ उमेदवारांची घोषणा करणार

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस-टीएमसी युती नाही, मुख्यमंत्री ममत बॅनर्जी आज ४२ उमेदवारांची घोषणा करणार

लोकसभा निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत. देशातील विरोधी पक्ष एकत्र येत इंडिया आघाडी केली, इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममत बॅनर्जी युतीमधून लढणार नसल्याचे बोलले जात आहे. आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ४२ लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीआधीच भाजपला धक्का! खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्ष सोडला, काँग्रेसमध्ये केला प्रवेश

 मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रविवारी राजधानी कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर 'जन गर्जन सभे' दरम्यान २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री जाहीर सभेला संबोधित करून निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि टीएमसी यांच्यात युतीबाबत चर्चा होऊ शकली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता टीएमसी एकट्याने निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.

टीएमसी मेगा रॅलीत आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करेल. याबाबतची माहिती सीएम ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. एक व्हिडीओ शेअर करताना मुख्यमंत्र्यांनी लोकांना रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, “बंगालचा संयम आणि सौजन्य ही त्याची कमजोरी मानू नये.

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यासह पक्षाचे अनेक नेते तृणमूल काँग्रेसच्या या जनगर्जन सभेत सहभागी होणार आहेत. या रॅलीदरम्यान टीएमसी केंद्र सरकारकडून राज्याची आर्थिक थकबाकी रोखण्यावर हल्ला करेल, ज्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तणाव आहे.

Web Title: There is no Congress-TMC alliance in West Bengal, Chief Minister Mamat Banerjee will announce 42 candidates today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.