"चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे..."; प्रयागराजच्या आयुक्तांनी भाविकांना काय केले होते आवाहन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:43 IST2025-01-29T13:41:49+5:302025-01-29T13:43:29+5:30
महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत अनेकांचा मृत्यू झाला असून, चेंगराचेंगरी होण्यापूर्वीचा आयुक्तांचा व्हिडीओ समोर आला आहे.

"चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे..."; प्रयागराजच्या आयुक्तांनी भाविकांना काय केले होते आवाहन?
Mahakumbh Stampede Video: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये बुधवारी (२९ जानेवारी) दुःखद घटना घडली. त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी हजारो भाविकांची झुबंड उडाली. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन काही जणांचा मृत्यू झाला, तर अनेक भाविक जखमी झाले. या चेंगराचेंगरीपूर्वीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यात आयुक्त भाविकांना गर्दी टाळण्यासाठी लवकर पवित्र स्नान करून घेण्याचं आवाहन करताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
माध्यमांच्या रिपोर्टनुसार, उद्घोषणा करणारी व्यक्ती आयुक्त आहेत. ते प्रयागराजचे आयुक्त असून, विजय विश्वास पंत असे त्यांचे नाव आहे. महाकुंभ मेळ्याला आलेल्या भाविकांना लवकरात लवकर स्नान करून घेण्याचे आवाहन करत आहेत.
आयुक्त कुंभमेळ्यातील भाविकांना काय म्हणाले?
आयुक्त म्हणत आहेत की, "सर्व भाविकांनी ऐकावं, येथे झोपून राहण्यात काही फायदा नाही. जो झोपून राहतो, तो गमावतो. उठा उठा, स्नान करा. हे तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी आहे. खूप येतील आणि चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. तुम्ही आधी आला आहात, त्यामुळे तुम्हाला सर्वात आधी अमृत मिळायला हवे. सर्व भाविकांना हात जोडून विनंती आहे. उठा, झोपू नका. जर सर्वात आधी आला आहात."
चेंगराचेंगरीपूर्वीचा आयुक्तांचा व्हिडीओ बघा
क्या कमिश्नर साहब को यह बोलना चाहिए कि भगदड़ मचने वाली है ??
— Amit Yadav (Journalist) (@amityadavbharat) January 29, 2025
यह प्रयागराज के कमिश्नर विजय विश्वास पंत सुनिए क्या कह रहे हैं...
यह वीडियो महाकुंभ में भगदड़ मचने से पहले की बताई जा रही है...#MahaKumbh2025#MahakumbhStampedepic.twitter.com/V3EBQwIS2h
चेंगराचेंगरी होण्याची शक्यता, आयुक्तांवर टीका
लोकांना स्नानासाठी जाण्याचे आवाहन करताना आयुक्तांनी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. त्यावरूनच आता टीका होत आहे. एका व्यक्तीने म्हटले आहे की, चेंगराचेंगरी होण्याची अफवा खुद्द आयुक्तच पसरवत असतील, तर दुर्घटना कशी होणार नाही?
हा व्हिडीओ शेअर करत एका स्थानिक पत्रकाराने उलट सवाल केले आहेत. अमित यादव यांनी म्हटले आहे की, "चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे, असे आयुक्तांनी म्हणायला पाहिजे होतं का? हे प्रयागराजचे आयुक्त विजय विश्वास पंत काय म्हणत आहेत? हा व्हिडीओ चेंगराचेंगरी होण्यापूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे", असे त्यांनी म्हटले आहे.