शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

गुजरातमधील EVM आणि VVPAT मशीनबाबत महत्त्वपूर्ण माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 4:55 PM

गुजरातमध्ये प्रतिकूल वातावरणातही निकाल भाजपाच्या बाजूने लागल्यापासून विरोधकांनी  ईव्हीएम  आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. आता विरोधकांच्या आरोपांदरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम आणि VVPAT मशीनबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. 

अहमदाबाद - अत्यंत अटीतटीच्या झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काठावरचे बहुमत मिळवत भाजपाने सत्ता राखण्यात यश मिळवले. मात्र प्रतिकूल वातावरणातही निकाल भाजपाच्या बाजूने लागल्यापासून विरोधकांनी  ईव्हीएम  आणि व्हीव्हीपॅट मशीनबाबत शंका उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. पाटीदार अनामत आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने तर हा ईव्हीएमचा विजय असल्याचा आरोप केला आहे. मात्र विरोधकांच्या आरोपांदरम्यान गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम आणि VVPAT मशीनबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. गुजरात विधानसभेच्या 182 मतदार संघांमधील 182 मतदान केंद्रांमधील VVPAT मशीन आणि ईव्हीएममशीन मधील आकडेवारी एकमेकांशी जुळवून पाहण्यात आली आहे. त्यामध्ये VVPAT आणि ईव्हीएममधील आकडे एकमेकाशी मिळतेजुळते असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ईव्हीएमबाबत होत असलेले आरोप निराधार असल्याचे सिद्ध झाले आहे.यादरम्यान  ईव्हीएमबाबत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांबाबत हिमाचल प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी पुष्पेंद्र राजपूत यांनीही स्पष्टीकरण दिले आहे.  ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार करता येऊ शकत नसल्याचे त्यांनी  मह्टले आहे. राजपूत म्हणाले, " कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी मी सर्वांना विनंती करतो. ईव्हीएम आणि VVPAT मशीन पूर्णपणे सुरक्षित असून, त्याद्वारे होणाऱ्या निवडणुका निष्पक्षपाती आहेत." गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला निसटता विजय मिळवण्यात यश मिळाल्यानंतर पाटीदार नेता हार्दिक पटेल याने ईव्हीएममध्ये झालेल्या गडबडीमुळे भाजपाचा विजय झाला, सनसनाटी आरोप केला होता. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मिळून ईव्हीएमविरोधात आंदोलन छेडले पाहिजे असे आवाहन केले होते.  गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला एकापाठोपाठ एक आरोप करून हैराण करणाऱ्या हार्दिक पटेलने मतदान आटोपल्यापासून ईव्हीएमवरून भाजपाला घेरण्यास सुरुवात केली होती. अहमदाबादमधील एका कंपनीचे 140 इंजिनियर पाच हजार इव्हीएम हॅक करण्याच्या तयारीत आहेत, असा गंभीर आरोप हार्दिक पटेलने ट्विटरवरून केला होता. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017VVPATव्हीव्हीपीएटीElectionनिवडणूक