शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

..तर बळीराजा आत्मनिर्भर बनेल - संचेती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 3:57 AM

१९३६ साली आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. त्या साली दुष्काळ पडला होता. त्यावेळी गावोगावी फिरून माल खरेदी करणे अडचणीचे होते

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याच्या हिताकरिता गेल्या आठवड्यात काही ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार पिकविलेला शेतमाल जो चांगल्यात चांगली किंमत देईल, अशा कोणालाही देशात कुठेही विकण्याची मुभा शेतकऱ्यांना राहणार आहे. या निर्णयामुळे ते परवानाराजमधून मुक्त होतील. शेतकºयांचा अनावश्यक खर्च वाचेल, वितरण व्यवस्था मजबूत होईल, कृषिक्षेत्रात गुंतवणूक वाढेल, एक देश एक मार्केट भावना वाढेल, कृषी उत्पादनावर सेस राहणार नाही, असा विश्वास आहे.

१९३६ साली आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. त्या साली दुष्काळ पडला होता. त्यावेळी गावोगावी फिरून माल खरेदी करणे अडचणीचे होते. त्यासाठी बाजार समित्या तयार करण्यात आल्या. त्यावेळच्या व आताच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे. परंतु कायदा तोच राहिला.जुन्या काळात शेतकºयाची फसवणूक होऊ नये या हेतूने कायदे केले गेले. त्यावेळी हातदांडीचे साखळीचे काटे होते, आता इलेक्ट्रिक काटे आले आहेत. त्यामुळे आज विचार केला तर शेतकºयाचे रक्षण होते का, अपवाद सोडला तर याचे उत्तर नकारार्थी येईल. सेस रद्द करण्याबाबत मागील सरकारबरोबर चर्चा झाली होती.महाराष्ट्रातील सेस रद्द केल्यास ३०० ते ३५० कोटी रुपयांचा भार शासनावर पडेल. अर्थसंकल्पाच्या मानाने ते नगण्य आहे. त्याची भरपाई जीएसटीमधून शासनास करता येईल, असा विश्वास आहे. बाजार समितीच्या कायद्यात बदल करण्याची जुनी मागणी होती त्यास केंद्राने प्रतिसाद दिला. या बदलांचा या घटकांना निश्चितच फायदा होईल. कायद्यात बदल झाल्यास भीती दाखविली जाते. व्यापाºयाने शेतकºयाचे पैसे बुडविले तर काय? पैसे बुडण्याचे काही कारण नाही. शेतकºयाने मालाचे पैसे बंद रोख घ्यावेत. मग बुडविण्याचा प्रश्नच येत नाही. कृषिमालाचा व्यापार करणारे व्यापारी हे फसवणूक करणारे आहेत ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आपण फ्री इकॉनॉमी मान्य केली आहे, कुठल्याही व्यवसायावर बंधन नाही मग फक्त कृषिमालाचे व्यापारावरच बंधन का याचा देखील यानिमित्ताने विचार होणे अतिशय गरजेचे आहे.केंद्र सरकारने शेतकºयांना त्यांचे उत्पादन कोठेही विकण्याची मुभा एका वटहुकुमाव्दारे नुकतीच दिली आहे. त्यामुळे शेतकरी, कृ षी उत्पन्न बाजार समितीसह या क्षेत्राशी संबंधित घटकांवर काय परिणाम होऊ शकतात याचा घेतलेला आढावा...

टॅग्स :Farmerशेतकरी