त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 05:35 IST2025-07-03T05:34:10+5:302025-07-03T05:35:57+5:30

ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल व्ही. राजू यांनी सांगितले की, हा कट काँग्रेसच्या नेतृत्वात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ‘यंग इंडियन’ नावाच्या कंपनीच्या स्थापनेद्वारे रचला.

Their assets worth Rs 2,000 crore were seized; ED alleges conspiracy by Sonia, Rahul Gandhi | त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप

त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप

नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील विशेष न्यायालयात दावा केला की काँग्रेसने ‘ॲसोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ (एजेएल) या संस्थेची २,००० कोटी रुपयांची मालमत्ता हडप करण्याचा कट रचला होता.

ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल व्ही. राजू यांनी सांगितले की, हा कट काँग्रेसच्या नेतृत्वात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी ‘यंग इंडियन’ नावाच्या कंपनीच्या स्थापनेद्वारे रचला. या कंपनीत दोघांचाही मिळून ७६% हिस्सा आहे. केवळ ९० कोटींच्या कर्जासाठी ही मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.

"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं

‘गैरव्यवहार ९८८ कोटींचा’

ईडीने असाही दावा केला की, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या अशाच सूचनांनुसार जाहिरात निधी एजेएलला पाठवण्यात आला होता. यापूर्वीच्या सुनावणीत, ईडीने सांगितले की, गांधींनी जवळपास १४२ कोटी अशाच गुन्ह्यांतून मिळवले.

नोव्हेंबर २०२३ मध्ये ईडीने ७५१.९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ईडीने या प्रकरणात सोनिया, राहुल गांधींसह समन दुबे, सॅम पित्रोदा यांच्याविरुद्धही आरोपपत्र दाखल केले असून, एकूण गैरव्यवहाराची रक्कम ९८८ कोटी असल्याचे नमूद केले आहे.

Web Title: Their assets worth Rs 2,000 crore were seized; ED alleges conspiracy by Sonia, Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.