मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 13:41 IST2025-08-14T13:28:56+5:302025-08-14T13:41:48+5:30
उर्मिला रात्रीच्या वेळी घरातून गुपचूप पळून चालली होती. पण त्याचवेळी तिचा नवरा रिंकूने तिला पाहिले अन्...

मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण...
लग्न हे बंधन जगातील सगळ्यात सुंदर बंधन आहे, असे सगळेच म्हणतात. या नात्यात परस्पर प्रेम, आदर आणि विश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. या सात जन्माच्या नात्यात जर तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली तर मात्र, त्यात वितुष्ट येऊ लागतात. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. झारखंडची राजधानी रांचीपासून १०० किलोमीटरवर असलेल्या गुमला या गावातून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. या गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिले.
सिसाई ब्लॉकमध्ये राहणाऱ्या रिंकू साहू नावाच्या एका व्यक्तीने त्याची पत्नी उर्मिला कुमारीचे लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिले. नंतर त्याने त्यांची आनंदाने पाठवणी देखील केली. पती रिंकू साहूला त्याच्या पत्नीच्या प्रेमसंबंधाबद्दल आधीच माहिती होती. त्यावरून त्यांच्यात अनेकदा भांडणे झाली होती. रिंकूने त्यांच्या ३ वर्षांच्या मुलीचे कारण सांगून उर्मिलाला असे न करण्याबद्दल अनेकदा पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. पण उर्मिला प्रेमात आंधळी झाली होती.
एके दिवशी उर्मिला रात्रीच्या वेळी घरातून गुपचूप पळून चालली होती. पण तिचा नवरा रिंकूने तिला पाहिले. रिंकूने गजर केला आणि संपूर्ण गावाला एकत्र केले. मग त्याने त्याच्यासमोर त्याच्या पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले आणि त्यांना निरोप दिला.
रिंकू साहूचे लग्न सुमारे ५ वर्षांपूर्वी उर्मिला कुमारीशी झाले होते. त्यांना एक मुलगी होती. बिहारच्या गया जिल्ह्यातील रहिवासी अविनाश कुमार त्यांच्यात आला तेव्हा त्यांचे वैवाहिक जीवन चांगले चालले होते. अविनाश एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करतो. अविनाश आणि उर्मिला जवळीक वाढली. ते एकमेकांना गुप्तपणे भेटू लागले. जेव्हा पती रिंकू साहूला त्याची पत्नी उर्मिला आणि तिचा प्रियकर अविनाश यांच्यातील वाढत्या जवळीकतेबद्दल कळले तेव्हा तो खूप निराश झाला.
पत्नी हट्टाला पेटली!
पती रिंकूने उर्मिलाला आधी समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती तिच्या प्रियकरासोबतच जाण्याचा हट्ट धरून बसली. हळूहळू ही बातमी संपूर्ण परिसरात पसरली. उर्मिलाच्या पालकांनीही तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे वैवाहिक जीवन वाचवण्याचा सल्ला दिल. पण, त्याचा उर्मिलावर कोणताही परिणाम झाला नाही. दरम्यान, उर्मिलाने तिचा प्रियकर अविनाशसोबत घरातून पळून जाण्याचा विचार केला आणि घरात ठेवलेले मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम सोबत घेऊन जाण्याचा प्लॅन रचला.
पतीला लागली कुणकुण...
मंगळवारी पत्नी घरातून पळून जात असताना रिंकूने तिला पाहिले आणि त्याने आरडाओरडा करत गावकऱ्यांना एकत्र केले. त्यानंतर गावकऱ्यांसमोर पंचायत बसली. पत्नीच्या बेवफाई आणि तिच्या कृत्यामुळे संतापलेल्या पती रिंकूने सगळ्यांसामोर सांगितले की, तो आता उर्मिलाशी असलेले सर्व संबंध तोडत आहे. यानंतर, पतीने आपल्या पत्नीचा प्रियकर अविनाश याला तिला सिंदूर लावायला सांगितल. त्याने सगळ्यांसामोर दोघांचे लग्न लावून दिले आणि दोघांची आनंदाने पाठवणी देखील केली.