"आईवडिलांचे सगळे जग, एका क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झालं", विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या संतापाचा कडेलोट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 19:53 IST2026-02-06T19:50:40+5:302026-02-06T19:53:49+5:30

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राजधानी दिल्लीत एक मन सुन्न करणारी घटना घडली. २५ वर्षाचा तरुण रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यात पडला. रात्रभर तडफडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला. 

"The whole world of parents, everything was destroyed in a moment", Opposition leader Rahul Gandhi's anger spilled over | "आईवडिलांचे सगळे जग, एका क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झालं", विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या संतापाचा कडेलोट  

"आईवडिलांचे सगळे जग, एका क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झालं", विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या संतापाचा कडेलोट  

"हा अपघात नाही, तर हत्या आहे. आणि उत्तरदायित्व झटकणारी, त्यापासून पळणारी सत्ता त्याची आरोपी आहे", असे म्हणत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारावर हल्ला चढवला. २५ वर्षीय कमल ध्यानी याचा दिल्लीतील जनकपुरी पश्चिम भागात रस्त्यावरील खड्ड्यात पडून मृत्यू झाला. रात्री १२ वाजेपासून बेपत्ता असलेल्या कमलचा सकाळी मृतदेहच मिळाला. या घटनेतील संतापजनक बाब म्हणजे पोलिसांचा मस्तवालपणा. कुटुंबीयांकडून शोध घेण्याची विनंती केली जात असतानाही पोलीस म्हणाले की, २५ तासांनंतर तक्रार नोंदवली जाईल.

दिल्लीतील जनकपुरी पश्चिममध्ये घडलेल्या या घटनेने दिल्ली हादरली आणि प्रशासकीय आणि पोलीस व्यवस्थेवर सडकून टीका होऊ लागली आहे. बँक कॉल सेंटरमध्ये काम करणारा कमल ध्यान हा २५ वर्षीय तरुण सुट्टी झाल्यानंतर घरी निघाला होता. पण, रस्त्यात खोदून ठेवलेला खड्डा त्याला दिसला नाही आणि तो त्यात पडला. सकाळी त्याचा मृतदेहच पोलिसांना मिळाला. 

राहुल गांधींची सरकारवर सडकून टीका

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेवर सरकारवर निशाणा साधला. फोटो पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले, "भारतात पसलेली लालच आणि बेजबाबदारीच्या रोगाने पुन्हा एकदा एका तरुणाचा जीव घेतला. एक मुलगा, एक स्वप्न, आईवडिलांचे सगळे जग, सर्व काही एका क्षणात उद्ध्वस्त झाले."

"हा अपघात नाहीये, ही हत्या आहे. आणि हत्यारे आहेत, जबाबदारीपासून पळणारी सत्ता. खरे आरोपी रस्ता नाहीये, जबाबदारी झटकणारी सत्ता आहे. कारण इथे राजीनामा घेतला जात नाही, शिक्षा मिळत नाही. न कुणाचा आंतरात्मा जिवंत होत", असा संताप राहुल गांधींनी व्यक्त केला. 

"इंदूरमधील विषारी पाणी, नोएडामध्ये युवराजचा जीव घेणारा रस्ता, कोसळणार पूल, धडकणाऱ्या रेल्वे, श्वास गुदमरून टाकणारे प्रदूषण... पण, कोणतेही उत्तरदायित्व नाही. आणि जोपर्यंत जबाबदारी ठरवली जाणार नाही, तोपर्यंत लालसेच्या या महामारीचा बळी ठरत राहणार आहे", असे राहुल गांधी म्हणाले. 

कुटुंबीयांची सात पोलीस ठाण्यात धाव, अधिकारी म्हणाले, असे दररोज बेपत्ता होतात

कमलला ११.३० वाजता घरच्यांनी कॉल केला होता. तो म्हणाला निघालोय, ३० मिनिटात पोहोचेन. पण, त्यानंतर तो आलाच नाही. घरच्यांनी कॉल केला, पण तो उचलत नव्हता. कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. तो कुठे सापडेना. तेव्हा पोलीस वेगवेगळ्या ठिकाणच्या पोलीस ठाण्यात गेले. सात पोलीस ठाण्यात कुटुंबीयांना उत्तर दिले गेले की, २४ तासानंतर बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली जाईल. 

कुटुंबीय म्हणाले, त्याचा कॉल लागतोय आम्हाला लोकेशन तरी द्या. पोलिसांनी उत्तर दिले. तुमच्याच मुलगा हरवला नाहीये, दररोज असे मुल हरवतात. कुटुंबीयांनी जनकपुरी पोलीस ठाण्यात विनवण्या केल्या. त्यांनी लोकेशन पाठवले, पण नंतर डिलीट करून टाकले. कुटुंबीयांनी विनंती केली, तर पोलीस म्हणाले, ते गोपनीयतेची बाब आहे तुम्हाला देऊ शकत नाही. 

कुटुंबीय शोध घेत राहिले. पहाट झाली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला, तेव्हा कमल एका खड्ड्यात मरून पडलेला होता. 

Web Title : दिल्ली में गड्ढे में गिरने से युवक की मौत, राहुल गांधी ने सरकार को घेरा

Web Summary : दिल्ली में गड्ढे में गिरने से 25 वर्षीय युवक की मौत पर राहुल गांधी ने सरकार की लापरवाही को जिम्मेदार ठहराया। उन्होंने इसे हत्या बताते हुए पुलिस की निष्क्रियता पर भी सवाल उठाए।

Web Title : Rahul Gandhi slams government after youth dies in Delhi pothole

Web Summary : Rahul Gandhi criticizes the government after a 25-year-old died in a Delhi pothole. He called it murder, blaming government negligence. Family alleges police inaction when reporting the disappearance.