ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे भारताचे जागतिक स्थान भक्कम; महत्त्वाच्या संस्थांमध्ये परदेशी पाहुण्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 10:02 IST2025-08-11T10:02:02+5:302025-08-11T10:02:33+5:30

अमेरिकेने सर्वाधिक २४१ अभ्यागत पाठवले, गेल्यावर्षी ही संख्या १३१ होती.

The success of Operation Sindoor has strengthened India global position | ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे भारताचे जागतिक स्थान भक्कम; महत्त्वाच्या संस्थांमध्ये परदेशी पाहुण्यांची गर्दी

ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे भारताचे जागतिक स्थान भक्कम; महत्त्वाच्या संस्थांमध्ये परदेशी पाहुण्यांची गर्दी

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताच्या सामर्थ्याचा दबदबा जगभरात दिसू लागला आहे. यामुळेच जगातील महत्त्वाच्या पाहुण्यांची संख्या वाढली आहे. जून २०२५ मध्ये देशातील १२३ महत्त्वाच्या आस्थापनांवर १,९६४ परदेशी पाहुणे आले. जून २०२४ मध्ये ही संख्या १,६१८ होती. अमेरिकेने सर्वाधिक २४१ अभ्यागत पाठवले, गेल्यावर्षी ही संख्या १३१ होती.

परदेशी पाहुण्यांनी भेटी दिलेल्या १२३ महत्त्वाच्या आस्थापनांना भेट देण्यासाठी गृह मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते, जी सखोल चौकशीनंतर दिली जाते. या भेटी देशाचा विकास आणि ताकद दाखविण्याचे राजनैतिक माध्यम आहेत.

कोणत्या देशाला कशात आहे रस? 

अमेरिका: अवकाश, डीआरडीओ, संरक्षण खरेदी आणि पुरवठा, वित्त, मानव संसाधन, पेट्रोलियम. 

रशिया : अणुऊर्जा, वित्त, संरक्षण खरेदी आणि पुरवठा, डीआरडीओ, पेट्रोलियम, जलवाहतूक आणि पोलाद. 

चीन: पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, जलवाहतूक आणि बंदरे, रसायने आणि खते. 

जपान, फ्रान्स आणि व्हिएतनाम: बंदरे, अवजड उद्योग, अणुऊर्जा, रसायने आणि खते, अवकाश.

किती जण कुठे गेले? 

३५४ जणांची संरक्षण खरेदी व पुरवठा विभागाला भेट. 

३०१ जणांची पेट्रोलियम- नैसर्गिक वायू मंत्रालयाला भेट दिली. 

२७९ जणांची अर्थ मंत्रालयाशी संबंधित विभागांना भेट. 

२६८ जणांना बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयात रस. 

१९४ दिली भेट. जणांनी डीआरडीओला

या देशांच्या पाहुण्यांचाही समावेश : भारतातील प्रमुख संस्थांना भेट देणाऱ्या देशांत रशिया (१८९), जपान (१६०), फ्रान्स (१००), व्हिएतमान (९७), चीन (५२), उत्तर कोरिया (२०), दक्षिण कोरिया (६३), श्रीलंका (२२), मालदीव (२), बांगलादेश (१), म्यानमार (३), इराण (५) व तुर्कस्तान (६) यांचा समावेश आहे.

Web Title: The success of Operation Sindoor has strengthened India global position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.