स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 06:25 IST2024-06-02T06:24:44+5:302024-06-02T06:25:01+5:30
११ एप्रिल रोजी महेंद्रगढमध्ये मद्यधुंद स्कूलबस चालकाने बस झाडाला धडकवल्याने ६ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले.

स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
- डाॅ. खुशालचंद बाहेती
चंडीगड : स्कूलबस चालकाने बसचा अपघात केल्यास शाळेचे संचालकही अपघातास जबाबदार ठरतात. त्यांना जबाबदारी इतरांवर ढकलता येणार नाही, असे पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने म्हटले आहे.
११ एप्रिल रोजी महेंद्रगढमध्ये मद्यधुंद स्कूलबस चालकाने बस झाडाला धडकवल्याने ६ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आणि अनेक जण जखमी झाले. कनिना येथील जीएल पब्लिक स्कूलचे संचालक सुभाष यादव यांना दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत मुलांच्या सदोष वधासाठी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये बस चालकासह आरोपी केले होते. आपण बसचा चालक किंवा मालक नाही म्हणत, यादव यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली.
मूलभूत कर्तव्य टाळले
न्यायमूर्ती अनुप चितकारा यांनी जामीन अर्ज फेटाळताना म्हटले की, शाळेच्या प्रशासकांनी प्रचंड निष्काळजी दाखविला आहे. त्यांनी ड्रायव्हरची नेमणूक करताना त्याला दारू किंवा इतर मादक पदार्थांचे व्यसन आहे काय, याची पडताळणी केली नाही.