धक्कादायक... पोलिसांनी मुलीचा मृतदेह रस्त्यावरून ओढत नेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 12:50 IST2023-04-24T12:50:17+5:302023-04-24T12:50:32+5:30

बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप

The police dragged the girl's body from the road in west bengal | धक्कादायक... पोलिसांनी मुलीचा मृतदेह रस्त्यावरून ओढत नेला

धक्कादायक... पोलिसांनी मुलीचा मृतदेह रस्त्यावरून ओढत नेला

कालियागंज : पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात एका १७ वर्षीय मुलीवर बलात्कार आणि हत्या केल्यानंतर हिंसाचार उसळला. मुलीचा मृतदेह घेण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गावकऱ्यांनी दगडफेक केली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांना पाचारण करावे लागले. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडत लाठीचार्जही केला. यानंतर येथे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

मुलीचा मृतदेह ओढत नेण्याची घटना शुक्रवारी घडली असून त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी दिनाजपूरला जाणार आहेत. कानूनगो यांनी ट्वीट केले होते की, मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, पोलिसांवर मुलीचा मृतदेह रस्त्यावरून ओढत नेत मृतदेहाची विटंबना केल्याचा आरोप आहे. 

पोलिस म्हणतात...
nमुलगी बेपत्ता होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तिच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली नाही. त्यानंतर कालियागंज परिसरातील एका कालव्यात मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला. 
nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यू झाल्याचे कारण समोर आले आहे. 
nपोलिसांनी सांगितले की, त्यांनी या प्रकरणी एका २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखत असल्याचे त्यांनी सांगितले.
 

 

Web Title: The police dragged the girl's body from the road in west bengal