या प्रेमाला म्हणावं तरी काय? ज्याच्याशी पोटच्या मुलीचं लग्न ठरवलं, त्याच्याशीच आईनं बांधली लग्नगाठ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 14:50 IST2025-06-03T14:49:01+5:302025-06-03T14:50:00+5:30

४५ वर्षांच्या एका महिलेने आपल्याच मुलीच्या होणाऱ्या पतीशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या या लग्नावर मुलीची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.

The mother tied the knot with the man she had decided to marry her daughter! | या प्रेमाला म्हणावं तरी काय? ज्याच्याशी पोटच्या मुलीचं लग्न ठरवलं, त्याच्याशीच आईनं बांधली लग्नगाठ!

या प्रेमाला म्हणावं तरी काय? ज्याच्याशी पोटच्या मुलीचं लग्न ठरवलं, त्याच्याशीच आईनं बांधली लग्नगाठ!

उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने नुकतेचे तिच्या मुलीचे लग्नकार्य काढले होते. मुलीसाठी सुयोग्य वर देखील आईने निवडला होता. होणाऱ्या जावयाशी सासूचं रोज बोलण होऊ लागलं. बोलता बोलता दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे कळलेच नाही. दोघांमधील प्रेम इतकं पुढे गेलं की, सासुनेच होणाऱ्या जावयाशी संसार थाटला. दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं. हे प्रकरण सध्या प्रचंड चर्चेत आलं आहे. 

या महिलेचे वय जवळपास ४५ वर्षे आणि, तर या तरुणाचे वय अवघे २२ वर्षे आहे. या महिलेला ३ मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्ये आहेट. गेल्या ३ वर्षांपूर्वी महिलेच्या पतीचे निधन झाले. ती चारही मुलांसोबत सासरी राहत होती.

लग्नाच्या कामासाठी सुरू झालेलं बोलणं!

या महिलेची मोठी मुलगी जवळपास २० वर्षांची आहे. घरात मुलीच्या लग्नासाठी लगबग सुरू होती. या महिलेने आपल्या मुलीसाठी बंडा गावातील एक मुलगा निवडला होता. दोघांच्या लग्नाच्या कामानिमित्ताने महिलेचे आपल्या होणाऱ्या जावयासोबत रोजच बोलणे होऊ लागले. दोघांचे बोलणे इतके वाढले की, त्यांचे प्रेमबंध जुळले. आईची आणि आपल्या होणाऱ्या पतीच्या प्रेमबंधाची कुणकुण मुलीला देखील लागली होती. मात्र, मुलीने दोघांचं नातं सहज स्वीकारलं. इतकंच नाही तर, तिने आईला लग्न करण्याचा सल्ला दिला. तर, मुलाच्या कुटुंबानेही या लग्नाला परवानगी दिली.    

दोन्ही घरातून परवानगी मिळताच शहजहांपूरच्या एका मंदिरात सात फेरे घेतले. दोघांच्या या अजब लग्नाची गजब गोष्ट सध्या त्यांच्या गावात चर्चेचा विषय ठरली आहे.  

Web Title: The mother tied the knot with the man she had decided to marry her daughter!