सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:38 IST2025-09-18T16:34:40+5:302025-09-18T16:38:00+5:30
Rajasthan Accident News: राजस्थानमधील जयपूर येथील जुन्या शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथील सुभाष चौक पौलीस ठाण्याच्या हद्दीतील झिलाई हाऊस येथे एक जुनं घर अचानक कोसळलं. या घराच्या ढिगाऱ्याखाली दोन महिला सापडल्या.

सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...
राजस्थानमधील जयपूर येथील जुन्या शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथील सुभाष चौक पौलीस ठाण्याच्या हद्दीतील झिलाई हाऊस येथे एक जुनं घर अचानक कोसळलं. या घराच्या ढिगाऱ्याखाली दोन महिला सापडल्या. त्यातील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तर तिची सून जखणी झाली. सुदैवाने ही दुर्घटना घडली तेव्हा दोन्ही मुलांनी पळून आपले प्राण वाचवले.
ही दुर्घटना गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. हे जुनं घर एकाएकी कोसळू लागलं. हे पाहून घरातील दोन मुले बाहेर पळाली. तर त्यांची आई घरातच अडकली. त्यादरम्यान, सून सुनीताला वाचवण्यासाठी तिची वृद्ध सासू धन्नीबाई हिने घरात धाव घेतली. मात्र तिच्या अंगावरही घराचा ढिगारा कोसळल्याने ती त्याखाली दबली गेली. ढिगाऱ्याखाली दबल्याने धन्नीबाई हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सून सुनीता ही गंभीर जखमी झाली. तिच्या पायाला फ्रॅक्चर झाला आहे. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, सुमारे १२ दिवसांपूर्वी याच परिसरात एख जुनी हवेली कोसळली होती. त्यात वडील आणि मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर येथील स्थानिक प्रशासनाने जयपूरमधील ४८ जुन्या घरांची ओळख पटवून पुढील कारवाईस सुरुवात केली होती. मात्र तरीही गेल्या पंधरा दिवसात दोन दुर्घटना घडून त्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे घटनास्थळावर उपस्थित लोकांना या दुर्घटनेसाठी स्थानिक प्रशासनाला जबाबदार ठरवले आहे.