जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 14:01 IST2025-09-12T14:00:54+5:302025-09-12T14:01:17+5:30
Telangana Accident News: तेलंगाणामधील जुन्या जिल्हाधिकारी भवनामध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. १९४१ साली चुना आणि विटांनी बांधलेल्या या ऐतिहासिक इमारतीचं छत सतत होत असलेल्या पावसामुळे कोसळलं. धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्घटना घडली तेव्हा जिल्ह्याचे प्रभारी मंत्री जुप्पली कृष्णारावा जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत समीक्षा बैठक घेत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...
तेलंगाणामधील जुन्या जिल्हाधिकारी भवनामध्ये गुरुवारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. १९४१ साली चुना आणि विटांनी बांधलेल्या या ऐतिहासिक इमारतीचं छत सतत होत असलेल्या पावसामुळे कोसळलं. धक्कादायक बाब म्हणजे ही दुर्घटना घडली तेव्हा जिल्ह्याचे प्रभारी मंत्री जुप्पली कृष्णारावा जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत समीक्षा बैठक घेत होते. त्याचवेळी बैठक सुरू असलेल्या ठिकाणामागचा भाग धडाधड कोसळला.
ही दुर्घटना घडली तेव्हा महसूल विभागासमोर तैनात दोन पोलीस कर्मचारी आणि सुमारे २० पेक्षा अधिक गाव महसूल अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर आपल्या पोस्टिंगची वाट पाहत होते. त्याचवेळी जोरदार आवाज आल्याने लोक घाबरून बाहेर पळाले. सुदैवाने छत कोसळत असतानाच सर्वजण सुरक्षित ठिकाणी पोहोचल्याने या दुर्घटनेत कुठलीही हानी झाली नाही.
या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे या इमारतीच्या बाल्कनीचा पूर्ण भाग कोसळून दुर्घटना झाली. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कक्षाबाबेर ठेवलेल्या महत्त्वपूर्ण फाईल आणि इतर कागदपत्रेही कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. दरम्यान, ही इमारती बरीच जुनी होती. तसेच तिच्या दुरुस्तीची मागणी केली जात होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
या दुर्घटनेनंतर प्रभारी मंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना इमारतीच्या जिर्ण भागाची दुरुस्ती करण्याची सूचना दिली आहे. तसेच येथील काही विभाग तात्पुरते इतर ठिकाणी हलवण्याचीही सूचना दिली आहे.