शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 05:40 IST

वक्फबद्दल सरकारने दाखल केले १,३३२ पानांचे शपथपत्र

नवी दिल्ली : वक्फ कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीचे समर्थन करताना केंद्र सरकारने संसदेने मंजूर केलेल्या या कायद्याला स्थगिती देण्यास शुक्रवारी विरोध केला. संसदेने मंजूर केलेल्या कायद्याला संवैधानिक कोंदण आहे, असेही सरकारने म्हटले आहे.हे खंडपीठ ५ मे रोजी अंतरिम निर्देश मागणाऱ्या याचिकांवर सुनावणी करेल.

केंद्र सरकारने याबाबत दाखल केलेल्या १,३३२ पानांच्या प्राथमिक शपथपत्रात वक्फ दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावण्याची विनंती केली. या कायद्यातील काही तरतुदींबाबत खोडसाळपणे चुकीचा भ्रम पसरवला जात असल्याचे केंद्र सरकारने नमूद केले.

२०१३ पासून वक्फ मालमत्तेत ११६% वाढ; केंद्र सरकारचा प्रतिज्ञापत्रात दावासरकारने असा दावा केला की, २०१३ पासून वक्फ मालमत्तेत ११६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१३ नंतर वक्फ जमिनीत २०,९२,०७२ एकरची वाढ झाली आहे, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. केंद्राने म्हटले की, हा कायदा वक्फ संस्थेला बळकटी देईल आणि संवैधानिक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करेल, तसेच वक्फची एकूण अंमलबजावणी सुलभ करेल.

कायद्यातील तरतुदी स्थगित करू नयेत, सरकारने खंडपीठाला केली विनंतीकेंद्र सरकारने म्हटले की, याचिकांवर सुनावणी करताना न्यायालय विविध पैलूंचा विचार करू शकते. परंतु आदेशाचे प्रतिकूल परिणाम जाणून घेतल्याशिवाय पूर्ण स्थगिती (किंवा आंशिक स्थगिती) लादणे अयोग्य ठरेल. केंद्राने सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला कायद्यातील तरतुदी स्थगित करू नयेत अशी विनंती केली. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार